Dadabhau Jadhav sakal
पुणे

Otur News : पिंपळगाव जोगा धरणातील बेपत्ता मच्छिमाराचा अठ्ठेचाळीस तासाने मिळाला मृतदेह

पराग जगताप

ओतूर - पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर येथील धरणाच्या पाणीसाठ्यात सितेवाडी जवळ मच्छिमारीसाठी गेल्या मच्छिमाराचा तब्बल अठ्ठेचाळीस तासाने मृतदेह मिळून आला आहे.

दादाभाऊ पुनाजी जाधव (वय-३८) रा. मढ, ता. जुन्नर असे धरणाच्या पाण्यात बुडालेल्या मच्छिमाराचे नाव असून, ते शनिवारी दुपारी चार वाजेदरम्यान पिंपळगाव जोगा धरणात मच्छिमारीसाठी गेला होता. त्यानंतर बेपत्ता झाले. त्यानंतर स्थानिक नागरीक व जुन्नर रेस्क्यू टीमने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळून आले नाही. तब्बल ४८ तासानंतर सोमवारी दुपारी रेस्क्यू टीमने त्याचा मृतदेह पाण्यात तरंगलेला मिळून आल्यावर पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

जुन्नर तालुक्यात पाच धरणे असून ही तालुक्यात आपतकालीन व्यवस्था तोकडी आहे. जुन्नर रेस्क्यू टीमचे काम चांगले असून ही योग्य साधन सामुग्री उपलब्ध नसल्याने आपत्कालीन स्थितीत रेस्क्यू टिमसह नागरीकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी जुन्नर तालुक्यात बोट उपलब्ध न झाल्यामुळे शोध कार्यास मोठा अडथळा निर्माण झाला.

नंतर आंबेगाव तालुक्यातील बोट मागवण्यात आली. त्यामुळे वेळ जास्त वाया गेला. सोमवारी दुपारी चार वाजे दरम्यान मृतदेह पाण्यात तरंगताना मिळून आला. जुन्नर तालुक्यात अशा घटना वारंवार घडत असताना देखील पाच महिन्यांपासून जुन्नर तालुक्यातील बोट नादुरुस्त असून ही प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही.

त्यामुळे या घटनेच शोधकार्यात वेळ वाया गेला. तरी प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थेसाठी सर्व धरणावर एक एक बोट व इतर साधन सामुग्री सज्ज ठेवावी अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warning Pune: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं फुल्ल; नदीपात्रात होणार विसर्ग

Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरण; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या समोर होणार आरोपींची ओळख परेड

Akshay Shinde Encounter: ''अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट'' वडिलांची हायकोर्टात धाव, SIT चौकशीची मागणी

Nashik Accident : बसचालकाचा ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर पडला पाय; शिवशाहीने ठोकल्या दुचाक्या

Nashik Cyber Fraud : इडीकडून अटकेची भिती दाखवून 90 लाखांना गंडा; सायबर पोलिसात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT