Pimpalwandi Ghat Sakal
पुणे

पिंपळवंडी बैलगाडा घाटाला ग्रामस्थांच्या सहाय्याने नवरूप

बैलगाडा यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावच्या मळगंगा देवीची यात्रा जवळ आली असुन रविवारी(ता.२४) भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे.

सिद्धार्थ कसबे

बैलगाडा यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावच्या मळगंगा देवीची यात्रा जवळ आली असुन रविवारी(ता.२४) भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपळवंडी - बैलगाडा (Bullock Cart) यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी (Pimpalwandi) गावच्या मळगंगा देवीची यात्रा (Malganga Devi Yatra) जवळ आली असुन रविवारी (ता. २४) भव्य बैलगाडा शर्यतींचे (Competition) आयोजन करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे बैलगाडा शर्यतींवर असलेल्या बंदी मुळे येथील बैलगाडा घाटाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती.

यावर्षी न्यायालयाने बंदी उठवल्याने सर्वत्र बैलगाडा शर्यती सुरु झाल्या आहेत. गेल्या महिन्या भरापासून पिंपळवंडी गावातील ग्रामस्थांनी घाट पुन्हा शर्यतींसाठी सज्ज करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन काम पुर्ण केले.या घाटासाठी गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले.यात पिंपळवंडी येथील प्रसिद्ध गाडामालक व गाडा कमिटीचे अध्यक्ष प्रकाश काकडे यांनी पुढाकार घेऊन घाटाला पुर्वीपेक्षाही सुंदर रूप देऊन नवसंजीवनी दिली. यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष विवेक बाळासाहेब काकडे यांचे जेसीबी,पोकलेन तसेच ट्रॅक्टर चालक संघटनेचे तुषार वाघ व मित्र परिवार यांच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने या घाटाचे व परिसराचे काम करण्यात आले.

मळगंगा देवीच्या परिसरात असणारा हा घाट आता पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला असुन रस्त्याने येणारे जाणारे अनेक लोक या घाटाची चर्चा करत असुन तालुक्यातील एक नावाजलेला घाट म्हणुन त्याची ओळख झालेली आहे.

मळगंगा यात्रेनिमित्त रविवारी(ता.२४)भव्य बैलगाडा शर्यंतीचे आयोजन करण्यात आले असुन पाच ते सहा लक्ष रुपयांची बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत.यासाठी बैलगाडा शर्यतीसाठी लागु असलेल्या सर्व नियमांचे पालन केले असुन बैलांना सावलीत बांधण्यासाठी घाटाजवळच असलेल्या अशोक रामभाऊ वामन यांच्या चिकूच्या बागेचा उपयोग करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय भुजबळ यांनी दिली.

या नवीन रूप प्राप्त झालेल्या घाटाच्या कामासाठी पिंपळवंडी गावचे सरपंच विकास भांगरे,उपसरपंच प्रदीप चाळक तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे योगदान लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT