पिंपरी : शहरातील सर्व औषधे दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरळीतपणे चालू आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशनकडून गरजू व्यक्तींना घरपोच औषधे देण्याचेही प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे पिंपरीकरांना वारंवार घराबाहेर पडण्याची गरज भासणार नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड स्टेशन येथे औषधांची घाऊक बाजार पेठ आहे. शहरात सुमारे ४०० घाऊक तर २ हजार किरकोळ औषध विक्रेते आहेत. राज्य सरकारने जनतेची गैरसोय होऊ नये याची किराणा माल दुकानांबरोबरच औषधे दुकानांना देखील २४ तास दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे.
पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खिंवसरा म्हणाले, "शहरात पूर्वीपासूनच औषधे दुकाने सुरळीतपणे चालू आहेत. औषधे उत्पादक कंपन्यांना पूर्वी चीनमधून कच्च्या मालाचा नीट पुरवठा होत नव्हता. परंतु, केंद्र व राज्य सरकारने चीनच्या कच्च्या मालावरील बरेचसे अवलंबित्व कमी केले आहे. त्यामुळे, औषधे पुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात शहरातील गरजू रूग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवारपासून (ता.५) घरपोच औषधे देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. या अगोदर मास्क, सॅनिटाइजर यांची कमतरता होती. मात्र, आता या वस्तू व्यवस्थित उपलब्ध आहेत."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.