पिंपरी - "सकाळ माध्यम समूह' व योगेश गवळी यूथ फाउंडेशनच्या वतीने दिवाळीपूर्व पहाटनिमित्त "महाराष्ट्राची सणयात्रा' हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये "सारेगम'फेम प्रथमेश लघाटे, सई टेंभेकर, चैतन्य कुलकर्णी, योगिता गोडबोले या प्रसिद्ध गायकांच्या स्वरात श्रवणीय गाणी ऐकण्याची संधी मिळणार आहे.
आपले सण व त्यांचे महत्त्व नवीन पिढीला व तरुणाईला समजावेत या हेतूने "महाराष्ट्राची सणयात्रा ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यक्रमात भारतीय, महाराष्ट्रीयन सणांचे महत्त्व सांगणारी गाणी सादर केली जाणार आहेत. "बहू असोत सुंदर संपन्न की महा', "प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा', "राम जन्मला गं सखे' "अंजनीच्या सूता', "सुंदरा मनामध्ये भरली' ते "जय जय महाराष्ट्र माझा' या आणि अशा अनेक सुंदर रचनांचा आनंद या कार्यक्रमाच्या निमित्ताने भोसरीकरांना घेता येणार आहे.
कार्यक्रमाविषयी थोडेसे
काय : "महाराष्ट्राची सणयात्रा' दिवाळीपूर्व पहाट
कधी - रविवार, ता. 15 ऑक्टोबर 2017
केव्हा - पहाटे 5.30 वाजता
कोठे : रामस्मृती लॉन्स, गवळी फार्म, आळंदी रस्ता, भोसरी
प्रवेश विनामूल्य व मर्यादित. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
प्रवेशिका मिळण्याची ठिकाणे
1) रामस्मृती लॉन्स, गवळी फार्म, आळंदी रस्ता, भोसरी. संपर्क : 8530602700
2) सकाळ, पिंपरी कार्यालय, सनशाईन प्लाझा, पहिला मजला, पिंपरी. संपर्क : 9112478831
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.