पुणे

नाशिक फाटा-चांडोली महामार्ग सहापदरी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘‘पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे २९ किलोमीटरपर्यंत लांबीच्या नाशिक फाटा ते चांडोली (खेड) या रस्त्याच्या सहा पदरीकरणासाठी केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. या कामासाठी जवळपास एक हजार कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत त्याची निविदा प्रक्रिया येत्या दीड महिन्यात पूर्ण केली जाईल,’’ अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

तीन ठिकाणी उड्डाण पूल
नाशिक फाटा ते चांडोली सहापदरीकरणात संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सेवा (सर्व्हिस) रस्ता करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन चाकणमध्ये २.२५ किलोमीटर, मोशीत २.५५ किलोमीटर तर चिंबळीत ७०० मीटर लांबीचे उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. 

नद्यांवर पूल, भुयारी मार्ग
भोसरी एमआयडीसी, इंद्रायणीनगर, कुरुळी, महाळुंगे, आळंदी फाटा आदींसह विविध ठिकाणी वाहनांसाठी भुयारी मार्ग करण्यात येणार असून, स्पाइन रोड, वाकी खुर्द येथे वाहनांसाठी ओव्हरपास करण्यात येणार आहे. इंद्रायणी व भामा नदी अशा दोन ठिकाणी मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. 

वाहतूक सक्षमतेसाठी
वाहनांसाठी काही ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत. तेथे स्थानिक वाहतूक भुयारी मार्गाने तर लांब पल्याच्या वाहनांसाठी त्यावरील सहापदरी महामार्गाने वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. या महामार्गावरील वाढलेली प्रचंड वाहनसंख्या, विष्यातील वाहतुकीची होणारी कोंडी या सर्व बाबींचा अभ्यास करून रस्त्याचा प्रकल्प अहवाल करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे भविष्यात पुणे-नाशिक महामार्गावरील दळणवळणाचा ताण कमी होऊन येथील वाहतूक व्यवस्था सक्षम होईल.

नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याचे सहापदरीकरण व्हावे, यासाठी गेल्या चार वर्षांपासून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे आमदार महेश लांडगे पाठपुरावा करीत होते. पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पालिका स्तरावरूनही या रस्त्याच्या सहापदरीकरणासाठी पाठपुरावा केला जात होता.
- नितीन काळजे, महापौर

नाशिक-पुणे महामार्गाचे सहा पदरीकरण झाल्यास भोसरी फाटा येथून नाशिककडे जाणे खूप सुलभ होणार आहे.
- एकनाथ पवार, सभागृह नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde : अन् विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून हॉटेलमधून पडले बाहेर, कारण काय?

Latest Marathi News Updates : डहाणूत बहुजन विकास आघाडीला धक्का; बविआच्या उमेदवाराचा भाजप प्रवेश

IND vs AUS : भारताचे आघाडीचे ६ फलंदाज ठरले? एका फोटोने पर्थ कसोटीसाठीची स्ट्रॅटजी केली उघड

FIR lodged on Vinod Tawde: आचारसंहिता भंग प्रकरणी विनोद तावडे, भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

World Men's Day : असंख्य पुरूषांच्या वाट्याला घुसमट; वेळीच मार्ग न सापडल्यास मानसिक आजारांसह व्यसनाधीनतेची भीती

SCROLL FOR NEXT