पुणे

रस्त्यावरील पार्किंग अन्‌ वाहतुकीचा बोजवारा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरीतील शगुन चौक ते साई चौकापर्यंत असलेल्या संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध मोबाईल बाजारपेठेतील अतिक्रमण व वाहतूक समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. मोबाईल दुकान व्यावसायिक तसेच फेरीवाल्यांकडून होणारी अतिक्रमणे, रस्त्याच्या दुतर्फा दुहेरी-तिहेरी पार्किंग हे येथील रोजचेच चित्र असून, महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची स्थानिक व्यापारी आणि नागरिकांची तक्रार आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराचा चारही दिशेने विस्तार होत आहे. वाहन उद्योगात भारतात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या या शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. तुलनेने बाजारपेठांच्या ठिकाणी पार्किंगसाठी कोणतीही स्वतंत्र जागा नाही. महापालिकेच्या वतीनेही बाजारपेठ परिसरात स्वतंत्र वाहनतळ उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळेच रस्त्यावरील पार्किंग व त्यातून उडणारा वाहतुकीचा बोजवारा हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे. 

आयुक्तांची पिंपरी कॅम्पला भेट
पिंपरी कॅम्प परिसराला भेट देऊन येथील रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत, असे आवाहन येथील व्यापारी असोसिएशनने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केले होते. त्यानुसार त्यांनी या परिसराची पाहणी करून येथील चित्र पाहून चिंता व्यक्त केली होती. तसेच या अतिक्रमणाविरोधात मोहीम हाती घेण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र त्याला महिना उलटूनही प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याने स्थानिक व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. 

बेशिस्तपणाचा कळस
या प्रश्‍नाबाबत वाहतूक पोलिस गंभीर नसल्याने अतिक्रमणकर्ते आणि सर्वसामान्यांमध्येही कमालीचे बेशिस्तपणाचे चित्र आहे. जवळपास ६० फूट रुंद असलेल्या शगुन चौक ते साई चौक रस्त्यावर एकूण दीडशे दुकाने आहेत. मोबाईल दुकानांनी त्यातील ८० टक्के बाजारपेठ व्यापली आहे. त्याव्यतिरिक्तही कपडे, एक्‍सेसरीज आणि तत्सम वस्तूंचे गाळे आहेत. बाजारभावाहूनही कमी दरात येथे मोबाईल मिळत असल्याने पिंपरी-चिंचवडसह लगतच्या भागातीलच ग्राहक येथे मोबाईल खरेदीसाठी येतात. पश्‍चिम महाराष्ट्रातील काही विक्रेतेही पिंपरीला प्राधान्य देतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी येथे भव्य शोरूम्स सुरू केले आहेत; मात्र त्याचे जाहिरात फलक, बॅनर्स थेट रस्त्यावर लावले आहेत. अनेक व्यावसायिकांनी शोरूम्सचे काउंटर्स पाच ते सात फूट बाहेर थेट रस्त्यावर आणले आहेत. पदपथ आणि रस्त्याचा बराचसा भाग या व्यावसायिकांनी अडविल्याने रहदारीचा रस्ता अरुंद झाला आहे. त्यातही फेरी आणि हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. या दुकानांमध्ये आलेल्या ग्राहकांकडून रस्त्यावरच बेशिस्तपणे वाहने लावली जातात. दुहेरी-तिहेरी पार्किंगमुळे वाहतुकीचा प्रश्‍न जटिल झाला आहे. मोठे वाहन जाण्याइतपतही मार्ग शिल्लक राहत नसल्याने कोंडीची समस्या वाढली आहे. गर्दीच्या वेळी या रस्त्यांवर चालायलाही जागा राहत नसल्याची नाराजी मदन शिंदे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: सांगोला मतदार केंद्राबाहेर शेकाप - ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले

Voting Percentage: दुपारी १ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर; महाराष्ट्र की झारखंड, मतदानात कोण ठरला मोठा भाऊ?

Assembly Election Voting 2024: ऐन मतदानाच्या दिवशी महाविकास आघाडीत फूट, उद्धव ठाकरेंना टेन्शन...काँग्रेसने भूमिका बदलली?

ICC T20I Ranking : हार्दिक पांड्या अव्वल; तिलक वर्माने कॅप्टन सूर्यासह ६८ फलंदाजांना एका झटक्यात मागे टाकले

Traffic Update: पुणे सातारा महामार्गावर अदभुतपुर्व वाहतुक कोंडी; 12 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT