पिंपरी - ‘‘राजकारण वाईट आहे; तर ते साफ करण्यासाठी तुम्हालाच त्यामध्ये यावे लागेल. राजकारणात तरुणांना चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत,’’ असे प्रतिपादन स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी येथे केले. सकाळ ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) यांच्या वतीने येथील एएसएम महाविद्यालयात आयोजित ‘सकाळ यिन संवाद’मध्ये त्या बोलत होत्या. त्या वेळी प्राचार्य डॉ. के. एम. जाधव, प्रा. सुभाष देवकुळे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी तरुणांच्या राजकारणातील सहभागाबाबत चर्चा केली. सावळे म्हणाल्या, ‘‘राजकारणात नवीन येणाऱ्यांना संघर्ष करावा लागतो. मात्र, संघर्षातून मिळालेल्या विजयाचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे तडफदार तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. कारण तरुण देशाचे भविष्य आहेत.’’ राजकारणी जर चुकत असतील तर त्यांची चूक त्यांना
ठामपणे दाखवली पाहिजे. ज्या देशाच्या तरुणांना प्रश्न पडत नाहीत, त्या देशाचे भविष्य अंधारमय असते. लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. जर राजकारणी योग्य नसेल तर नोटा बटन दाबून मतदानकेले पाहिजे; असेही त्या म्हणाल्या. प्राचार्य जाधव म्हणाले, ‘‘शहरातील अनेक सोसायट्यांना टॅंकरने पाणीपुरवठा होतो. शहर जर टॅंकरमुक्त झाले, तर खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी होईल.’’ महाविद्यालय यिन प्रमुख राजबीर होट्टी, देबोश्री सरकार, महेश पानमंद यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. सूत्रसंचालन मयूरी बांठिया यांनी केले. तर प्राचार्य जाधव यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.