Pinnac Group sakal
पुणे

Startup : ‘पिनाक लॅंड बँक’ स्टार्टअपद्वारे करा जमिनीच्या जोखमींचे मूल्यमापन!

नियोजित बांधकाम प्रकल्पासाठी विकसकांना हव्या असणाऱ्या भागामध्ये जमीन शोधणे हे विकसक आणि कंपन्यांसाठी मोठे वेळखाऊ काम असते.

सनील गाडेकर

पुणे - नियोजित बांधकाम प्रकल्पासाठी विकसकांना हव्या असणाऱ्या भागामध्ये जमीन शोधणे हे विकसक आणि कंपन्यांसाठी मोठे वेळखाऊ काम असते. जमीन मिळाली तर तिच्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करणे सोपे नसते.

जमिनीचे न्यायालयीन वाद सुरू असल्याचे लपवून ठेवण्याचे, तसेच काही मध्यस्थ जमिनींची कमी रकमेत करार करून विकसकांना जास्त किमतीला विकतात, असे प्रकार सर्रास बांधकाम क्षेत्रात होतात. त्यात शेतकरी आणि विकसकाचे नुकसान होते.

व्यवहार करीत असलेली जमीन कायदेशीरदृष्ट्या अडचणीची असेल, तसेच प्रकल्प सुरू करण्यासाठी जास्त वेळ लागणारा असेल तर त्याचा मोठा फटका विकासकांना आणि जमीन मालकांना सहन करावा लागतो. तसेच काही अडचण निर्माण झाल्यास देखील आर्थिक झळ देखील बसू शकते. शेतकऱ्याने योग्य व्यक्तीच्या माध्यमातून व्यवहार केला नाही तर त्याला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळाल्याची देखील उदाहरणे आहेत.

त्यामुळेच चांगल्या जमिनीची (लॅण्ड पार्सल) उपलब्धता विकसकांसाठी महत्त्वाची ठरत आहे. व्यवसाया दरम्यान विकसकांना अनेकदा भेडसावणारी ही समस्या दूर करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी पुण्यातील एका सल्लागार संस्थेने ‘पिनाक लँड बँक’ (Pinnacgroup) हे अनोखे स्टार्टअप सुरू केले आहे.

अनुभवाची सांगड

गेल्या ३० वर्षांपासून बांधकाम क्षेत्राशी संबंधित असलेले दिनेश चंद्रात्रे आणि त्यांची मुलगी मैथिली चंद्रात्रे-शेट्टी यांनी हे स्टार्टअप सुरू केले आहे. दिनेश चंद्रात्रे यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले असून ते १९८७ सालापासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. तर मैथिली यांनी नानावटी कॉलेजमधून आर्किटेक्चरची पदवी मिळविलेली आहे. त्यानंतर त्यांनी सिंगापूर व लंडन येथून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. पर्यावरणीय मंजुरी आणि ग्रीन बिल्डिंग सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत.

काय मदत होते?

  • जमीन मालकांना कोणकोणत्या मोठ्या बांधकाम कंपन्या, मोठ-मोठे विकसक या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांना कोणत्या भागामध्ये, किती प्रमाणांत, काय अटींवर जमिनीची आवश्यकता आहे, याची कल्पना नसते.

  • त्यामुळे या दोघांच्या सोर्इसाठी एक प्लॅटफार्म सुरू करण्याची आवश्यकता जाणवली.

  • जमिनीचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही तिची प्राथमिक तांत्रिक छाननी आणि त्यानंतर जोखमीचे मूल्यमापन करतो.

  • जमीन विक्रीयोग्य असेल किंवा त्यावर एखादा मोठा प्रकल्प उभा राहण्याची शक्यता असेल तर त्या जमिनीची माहिती आम्ही आमच्या प्लॅटफार्मवर उपलब्ध करून देतो.

स्टार्टअपची वैशिष्ट्ये

  • बांधकामासाठी योग्य असलेल्या जमिनीची माहिती एकत्रितपणे मिळते

  • जमिनीची प्राथमिक तांत्रिक छाननी व जोखमीचे मूल्यमापन

  • खरेदीवेळी विकसकाची होणारी फसवणूक टळते

  • शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळतो

  • एकास परिसरात विकसकाला जमिनीचे अनेक पर्याय मिळतात

वादग्रस्त जमिनीवर प्रकल्प सुरू केल्यास तो पूर्ण करताना विकसकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सदनिकाधारकांना वेळेत घर मिळत नाही. हे सर्व टाळण्यासाठी आम्ही या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे.

- दिनेश चंद्रात्रे, मैथिली चंद्रात्रे-शेट्टी, संस्थापक, पिनाक लँड बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT