aga khan palace sakal
पुणे

Aga Khan Palace : पुणे परिसर दर्शन : आगाखान पॅलेस- चलेजाव चळवळीची आठवण

आगाखान हे निझारी इस्माईली प्रकारच्या इस्लामी पंथाचे ४८ वे इमाम होते. त्यांना मानणारे त्यांच्या इस्लामी पंथाचे लाखो लोक इराण ते भारत असे बऱ्याच भागात पसरले होते.

सकाळ वृत्तसेवा

आगाखान हे निझारी इस्माईली प्रकारच्या इस्लामी पंथाचे ४८ वे इमाम होते. त्यांना मानणारे त्यांच्या इस्लामी पंथाचे लाखो लोक इराण ते भारत असे बऱ्याच भागात पसरले होते.

‘आगाखान पॅलेस’ हे नाव ऐकलं की आपल्या नजरेसमोर येतात ते महात्मा गांधी. १९४२ च्या चळवळीच्या वेळेस महात्मा गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी, त्यांचे सहाय्यक महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांना आगाखान पॅलेसमध्ये नजर कैदेत ठेवले होते. त्यामुळे पेशवाईनंतर प्रथमच पुणे हे राष्ट्रीय राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. अनेक नेते, इंग्रज अधिकारी, पत्रकार गांधीजींना येथे भेटायला येत असतं.

आगाखान हे निझारी इस्माईली प्रकारच्या इस्लामी पंथाचे ४८ वे इमाम होते. त्यांना मानणारे त्यांच्या इस्लामी पंथाचे लाखो लोक इराण ते भारत असे बऱ्याच भागात पसरले होते. या आगाखान यांचा जन्म २ नोव्हेंबर १८७७ ला लाहोर येथे झाला. त्यांचे इस्लामी आणि आधुनिक असे शिक्षण पूर्ण झाले होते. पण वयाच्या आठव्या वर्षी वडील गेल्यामुळे इमाम होण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांनी इस्लामच्या त्यांच्या पंथासाठी खूप काम करून ठेवले आहे. १८९२ च्या दुष्काळामध्ये त्यांनी हजारो लोकांना तयार अन्न तसेच धान्य वाटप केले होते. सहा महिने हे वाटप चालू होते.

आगाखान पॅलेसचे बांधकाम दुष्काळात लोकांना काम मिळावे या हेतूने केले आहे. १९ एकर जागेवर आगाखान पॅलेस बांधला आहे. तीन मजली बांधकामावर युरोपियन आणि पर्शियन बांधकाम शैलीचा प्रभाव दिसतो. करीम आगाखान या आगाखान तृतीय यांच्या मुलाने १९६९ मध्ये आगाखान पॅलेस सरकारला सुपूर्त केले आणि २००३ मध्ये भारत सरकारने या पॅलेसला ‘राष्ट्रीय स्मारक’ हा दर्जा दिला.

महात्मा गांधी नजर कैदेत असताना आधी १५ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांचे सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन झाले आणि नंतर २२ फेब्रुवारी १९४४ रोजी महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले. या दोघांच्या समाधी इथेच बाजूच्या अंगणामध्ये आहेत. त्यांच्या जवळच गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांची अस्थिरक्षा सुद्धा पुरलेली आहे. आज या आगाखान पॅलेसमध्ये गांधीजींच्या इथल्या वास्तव्यावर आधारित आणि इतर चळवळींवर माहितीपूर्ण असे प्रदर्शन ठेवलेले आहे. फोटो, माहिती आणि फिल्म असे सहा दालनाचे प्रदर्शन आहे.

काय पहाल?

भव्य बांधकाम असलेले आगाखान पॅलेस, त्याच्यावर असलेला पर्शियन आणि युरोपियन बांधकामाचा प्रभाव, सहा दालनांमध्ये असलेले गांधीजींविषयी प्रदर्शन, त्याच्यामध्ये काही मूर्ती रूपात प्रसंग आहेत; तसेच एक रेकॉर्डेड आवाजातलं निवेदन आणि एक फिल्म यांचं प्रदर्शन सुद्धा आहे. कस्तुरबा गांधी आणि गांधींचे सहाय्यक महादेव देसाई यांची समाधी.

कसे पोहचाल

पुण्यातून नगर रस्त्यावर गेल्यावर आगाखान पॅलेस प्रसिद्ध आहे. तिथे पीएमपीने किंवा स्वतःच्या वाहनाने जाता येते.

वेळ - सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३०

प्रवेश शुल्क - २० रुपये प्रत्येकी

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी- गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT