Sangramdurg Fort sakal
पुणे

Sangramdurg Fort : पुणे परिसर दर्शन : अद्भुत पराक्रमाचे प्रतीक संग्रामदुर्ग

सकाळ वृत्तसेवा

शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामात मावळ्यांनी अनेक पराक्रम केले, त्यातलाच एक वीर म्हणजे फिरंगोजी नरसाळा. शाईस्तेखान हा औरंगजेबाचा मामा, याला दख्खनच्या स्वारीवर पाठवून संपूर्ण हिंदुस्तान मुघल वर्चस्वाखाली आणायचा बेत औरंगजेबाने केला. त्याप्रमाणे मोठा गाजावाजा करत प्रचंड फौज बरोबर घेऊन शाईस्तेखान किंवा शास्ता खान, म्हणजेच मिर्जा अबू तालिब दख्खनवर चालून आला. त्याने त्याच्या मोहिमेची सुरवात केली ती संग्रामदुर्गपासून.

२१ जून १६६० रोजी २० ते ३० हजार फौजेने किल्ल्यास वेढा घातला. चुटकीसरशी चाकण जिंकून घेऊ, हा शाईस्तेखानाचा समज लवकरच धुळीस मिळाला. अवघ्या काही मावळ्यांना बरोबर घेऊन फिरंगोजिंनी किल्ला तब्बल ५६ दिवस लढवला. आजूबाजूला सैन्य एवढे की, बाहेरून आत मदत पण पाठवता येत नव्हती. तोफा, बंदुकांचा काही उपयोग होईना, अखेर खानाने भुयार खणून तट उडवून देण्याचा निर्णय घेतला. गुपचूप भुयार खणले.

पूर्वेच्या कोपऱ्यातील बुरूज स्फोटामुळे उडाला आणि किल्ल्याला खिंडार पडले. तरी फिरंगोजी सैन्य घेऊन हे खिंडार लढवत होते. अखेर नाइलाजाने गड मुघलांच्या ताब्यात द्यावा लागला. असा हा संग्रामदुर्ग आज ढासळलेल्या अवस्थेत उभा आहे, त्याच्या मधोमध एक रस्ता पलीकडे जातो, तरी तटबंदी, वाड्याचे अवशेष मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. किल्ल्याभोवती खंदक शिल्लक आहे. महाराष्ट्र पुरातत्त्व खाते दुरुस्ती करत आहे; तसेच शिवप्रेमी संस्था स्वच्छता आणि संवर्धनात सहभागी होत असतात.

हा किल्ला चौदाव्या शतकापासून नगरच्या निजमाकडे आणि नंतर आदिलशाहीत होता, १६४७ च्या दरम्यान तो स्वराज्यात आला आणि महाराजांनी त्याचे नाव ‘संग्रामदुर्ग’ ठेवले. या किल्ल्याची किल्लेदारी फिरंगोजिंकडे सुपूर्त केली. या किल्ल्याजवळ चक्रेश्वर महादेवाचे मंदिर आहे.

काय पहाल?

तटबंदी, वाड्याचे अवशेष, खंदक, चक्रेश्वर मंदिर, पुष्करणी

कसे पोहचाल

चाकणला सिटी बस तसेच राज्य परिवहन बस जाते.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT