पुणे : ‘‘डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती अभिनव भारत व्यासपीठा’ची स्थापना करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २०) सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे,’’ अशी माहिती महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन आपटे यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘फर्ग्युसन महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९०२ ते १९०५ या कालावधीत बी.ए.चे शिक्षण घेतले. या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांना स्वदेशी चळवळीसाठी प्रोत्साहन दिले. महाविद्यालयाच्या वसतिगृह क्रमांक एकमधील खोलीत ते वास्तव्यास होते. त्यांचे निवासस्थान असलेली खोली स्वतंत्र स्मृतिस्थळ म्हणून विकसित केली आहे. या पवित्र वास्तूलगत डीर्सई नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाची इमारत आहे. सावरकरांच्या स्मृती जतन करण्यासाठी या व्यासपीठाची स्थापना केली आहे. सामान्य जनतेला महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर जागरूक होऊन आपले मत मांडता यावे, हा व्यासपीठाचा उद्देश आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम सुरू केला आहे.’’
या उपक्रमाअंतर्गत शनिवारी (ता. २१) प्रभारी प्राचार्या डॉ. प्रिया चोपडे यांचे ‘समान नागरी कायदा’, रविवारी (ता. २२) अर्थतज्ज्ञ मधुरा आपटे यांचे ‘भारतीय अर्थशास्त्राचा अभ्यास’, सोमवारी (ता. २३) परराष्ट्र नीती अभ्यासक सौरभ जाधव यांचे ‘भारतीय परराष्ट्रीय धोरण’ आणि मंगळवारी (ता. २४) संस्थेचे उपाध्यक्ष महेश आठवले यांचे ‘सुशासन आणि भारतीय नीतिमूल्य व्यवस्था’या विषयांवर व्याख्याने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.