plot worth crores bargain price Pune Market  sakal
पुणे

Pune : कोट्यवधींचा भूखंड कवडीमोल दरात

पुणे बाजार समितीमधील प्रकार : १५ अडत्यांवर प्रशासन मेहरबान

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीने अद्ययावत बाजार उभारणीसाठी ठेवलेला सातारा रस्त्यावरून बाजार समितीकडे जाणाऱ्या शिवनेरी रस्त्यावरील कोट्यवधी रुपयांचा भूखंड कवडीमोल दरात १५ अडत्यांना दिला आहे. विशेष म्हणजे पणन संचालकांनी चौकशीचे आदेश दिलेले असतानाही हा प्रकार घडला आहे.

फळ बाजारात काही मोजक्या अडत्यांना पूर्वी डाळिंब विक्रीसाठी शेड दिले आहेत. त्यानंतर काही अडत्यांनीही डाळिंब विक्रीला अतिरिक्त जागेची मागणी लावून धरली. तीन ते चार वर्षांपूर्वी बाजार समितीने चार नंबर गेट लगत न्यायप्रविष्ट जागेत डाळिंब यार्ड बांधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विरोधामुळे ते काम बंद करण्यात आले.

दरम्यान, मार्केट यार्डाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुमारे सव्वातीन एकर जागेत पार्किंग आहे. मात्र, हा भूखंड जास्त असल्याने येथे काय करायचे, यासाठी समितीने अडते आणि दि पूना मर्चंट चेंबरच्या पदाधिकाऱ्यांची दोन महिन्यांपूर्वी बैठक घेतली. त्यामध्ये या भूखंडावर अद्ययावत बाजार उभारण्याचे निश्चित झाले. यासाठी बाजार समितीने वास्तुविशारदकाची नेमणूक केली असून त्याबाबत अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत.

सव्वाचार लाख रुपये आकारणार

शिवनेरी रस्त्यावरील मोक्याचा भूखंड डाळिंब व्यापारासाठी १५ अडत्यांना बाजार समिती प्रशासनाने दिला आहे. या भूखंडाचे दरमहा सव्वाचार लाख रुपये आकारणार आहे. वास्तविक व्यापारी मूळ गाळ्यावर सेस भरतच असतात, त्यामुळे नव्याने दिलेला भूखंड अडत्यांना कवडीमोल दरात मिळाल्यासारखी आहे.

भूखंड वाटपाची चौकशी

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने हा भूखंड १५ अडत्यांना तुटपुंज्या दराने भाडेतत्त्वावर दिल्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. पणन संचालकांनी या भूखंडाची चौकशी सुरू केलेली आहे.

तरीही बाजार समितीने पणन संचालनालयाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे चौकशी सुरू असताना पणन संचालक या प्रस्तावाला मान्यता देणार का, याकडे लक्ष लागले आहे.

कोटीपेक्षा अधिक उत्पन्न : गरड

या भूखंडाच्या पश्चिमेकडील बाजूस भिंतीलगत आणि उत्तरेकडील बाजूस नाल्यालगत उपद्रवी लोकांचा वावर आहे. तेथे वाहनचालकांचे पैसे, शेतीमाल व मोबाईलची चोरी होते. त्यामुळे प्रत्येकी सुमारे १,२५० चौरस फूट मोकळी जागा ‘लिव्ह ॲण्ड लायसन्स’ या तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात १५ अडत्यांना दिली आहे.

तीन एकर १४ गुंठ्यापैकी केवळ १७ ते १८ गुंठे जागेवर ही व्यवस्था करून या जागेचा वापर बाजार समितीने सुरू केला आहे. त्यामुळे बाजार समितीला किमान ७५ लाख आणि व्यवसाय वाढीनंतर एक कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळणार असल्याचा दावा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT