याबाबत सिंहगड पीएमएवाय सोसायटीचे सचिन देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आम्हाला महापालिकेची कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले.
धायरी : प्रधानमंत्री आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana Pune) वडगाव खुर्द प्रकल्पामागील डीपी रस्त्यावर रहिवाशांकडून करण्यात आलेले अनधिकृत पार्किंग हटवा, असे सक्त आदेश महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडून देण्यात आले आहे. गाड्या न हटवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना वडगाव खुर्द प्रकल्पातील सुमारे 200 ते 300 गाड्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि रहिवासी मागील बाजूस तयार होत असलेल्या डीपी रस्त्यावर अनधिकृत पार्किंग केल्या आहेत. सोसायटीच्या वतीने या रस्त्यावर अतिक्रमण केले गेले आहे.
या संदर्भातील वृत्त 'दैनिक सकाळ' या वृत्तपत्रात नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना विभागाकडून नागरिकांना ही गाड्या हटवण्यासंदर्भात सक्त सूचना देण्यात आली आहे. तिचे पालन झाल्यास पदाधिकारी आणि रहिवाशांच्या गाड्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
या गृह प्रकल्पालगत असलेल्या ३०.०० मी. विकास योजना रस्त्यावर (डीपी) मोठ्या प्रमाणात वाहन पार्किंगची सोय केल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता पार्किंग करण्याकरिता नाही याची नोंद घ्यावी, तसेच या रस्त्यावर केलेले पार्किंग त्वरीत काढून घेण्यात यावे. तसेच, भविष्यामध्ये या ठिकाणी पार्किंग करण्यात येऊ नये. अन्यथा पुणे महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल. पुणे महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या नोटीसमध्ये सांगितले आहे.
याबाबत सिंहगड पीएमएवाय सोसायटीचे सचिन देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला महापालिकेची कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे सांगत, सोसायटीचे सेक्रेटरी सचिन आनंदे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. सचिन आनंदे यांना संपर्क केला असता, त्यांनी कॉलला प्रतिसाद दिला नाही, परंतु महापालिकेच्या पीएमएवाय विभागाचे उपअभियंता उदय पाटील यांनी नोटीस सोसायटीच्या ई-मेल वर पाठवल्याचे सांगितले.
वडगाव खुर्द येथील पंतप्रधान आवास योजनेतील एम एन जी एल कडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता खोदकाम आणि महानगरपालिकेच्या डीपी रस्त्यावर केलेले अनाधिकृत पार्किंग थांबवले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-उदय पाटील, उपअभियंता, प्रधानमंत्री आवास योजना, पुणे महानगरपालिका
याबाबत मी काही बोलू शकणार नाही, तसेच वरिष्ठांना या बाबीत आपण विचारले तर बरं होईल.
-नरेश रायकर, उपअभियंता, पथ विभाग, पुणे महानगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.