पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज रविवारी मेट्रोसह (Metro) विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी पुणे दौऱ्यावर (Pune Tour) येत आहेत. याबाबत महामेट्रो (Mahametro) आणि महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. महापालिकेची निवडणूक (Municipal Election) पुढील काही महिन्यात होणार असल्याने भाजपने (BJP) यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज दिवसभरात मोदींच्या या दौऱ्यासंदर्भात घडणारे लाईव्ह अपडेट्स फक्त 'सकाळ'वर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिम्बॉयसिसमध्ये असं म्हटलंय की, आपम कोरोना परिस्थिती आणि आता युक्रेनमधील परिस्थिती यशस्वीरित्या सांभाळली आहे. आपल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. मोठ्या देशांनाही असं करण्यात अडचण येत आहे, परंतु भारताची वाढत्या लवचिकतेमुळे आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे
मराठीत भाषणाला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यातील माझ्या बंधु-भगिणींना नमस्कार करतो.
देश स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करतो आहे. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये पुण्याचं योगदान ऐतिहासिक राहिलंय.
लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, सेनापती बापट, गोपाळकृष्ण देशमुख यासारख्या अनेक स्वातंत्र्य सेनानींना आदरपूर्वक नमन
आज महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित राहिलेल्या रामभाऊ म्हाळगींची पुण्यतिथी देखील आहे. बाबासाहेब पुरंदरेंचीही मी आठवण काढतो आहे.
काही वेळापूर्वीच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं उद्घाटन करण्याचं सौभाग्य मला मिळालं आहे.
पुणे मेट्रोच्या भूमिपूजनासाठी तुम्ही मला बोलावलं होतं. तसेच आज लोकार्पणासाठीही मला संधी तुम्ही दिलीत त्याबद्दल मी आभार मानतो.
आधी भूमीपूजन झाल्यावर कळायचंच नाही की कधी उद्घाटन होणार आहे. हे यासाठी महत्त्वाचं की, वेळेवर प्रकल्प पूर्णत्वास नेले जाऊ शकतात.
आज मुळा-मुठेसाठी 1100 कोटींच्या प्रोजक्टवर काम सुरु होत आहे.
आज पुण्याला ई-बसेसही मिळत आहेत.
आज पुण्याच्या विविधता पूर्ण आयुष्यात एक सुंदर भेट मिळाली आहे. ती म्हणजे आर के लक्ष्मण यांची आर्ट गॅलरी पुण्याला प्राप्त झाली आहे.
पुणे वासियांचं मी खूप अभिनंदन करतो.
मी दोन्ही महापौरांना, त्यांच्या सहकाऱ्यांना खूप खूप सदिच्छा देतो.
पुणे आपल्या सांस्कृतिक, आध्यात्मिक तसेच राष्ट्रभक्तीसाठी प्रसिद्ध राहिलं आहे.
सोबतच पुणेने शिक्षण, रिसर्च आणि डेव्हलपमेंट, आयटी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगती केली आहे.
आमचं सरकार पुणेवासियांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक प्रकल्पांवर काम करत आहे.
काही वेळापूर्वी मी मेट्रोने प्रवास केला. ही मेट्रो प्रवास सोपा करेल, प्रदुषणापासून मुक्तता करेल.
कोरोना साथीदरम्यानही मेट्रो सेवेसाठी तयार आहे.
आपल्या देशात गतीने शहरीकरण होत आहे. 2030 पर्यंत आपली शहरी लोकसंख्या 60 कोटींच्या पार जाईल. ही लोकसंख्या अनेक संधी प्रमाणेच आव्हानेही घेऊन येते. शहरात निश्चित सीमेमध्येच फ्लायओव्हर बनू शकतात. अशामध्ये आपल्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे मास ट्रान्सपोर्टेशन.. त्याची अधिकाधिक निर्मिती करणे होय. त्यासाठी आमचं सरकार काम करत आहे.
2014 पर्यंत देशात फक्त दिल्ली NCR मध्येच मेट्रोचा विकास झाला होता. आज देशात दोन डझनाहून अधिक शहरांमध्ये मेट्रो एकतर सुरु झालीये अथवा तीचं काम सुरु आहे.
यामध्ये महाराष्ट्रात पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, ठाणेमध्ये मेट्रोचा विस्तार होत आहे.
मेट्रोने प्रवास करण्याची सवय लावून घ्या. तुम्ही जितका प्रवास मेट्रोमधून कराल, तेवढी तुम्ही आपल्या शहराची मदत कराल.
पंतप्रधान मोदीजी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं पुण्यात स्वागत
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पाचे भूमीपूजन आणि उद्घाटन झालं आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने मोदींचे आभार
पुणेकरांच्या सहनशीलतेला दाद दिली पाहिजे. ठराव झाल्यानंतर बारा वर्षानंतर मेट्रो सुरु झाली.
पुणेकरांना मेट्रोच्या कामामुळे खूप त्रास सहन करावा लागला म्हणून तुमच्या सहनशीलतेला सलाम करतो. आणखी काही काळाकरिता तो सहन करावा लागेल.
मोदींना सांगू इच्छितो की, 2006 ला भूमिपूजन आणि 2014 मध्ये मनमोहन सिंगाच्या हस्ते मुंबई मेट्रोचं उद्घाटन झालं.
रखडलेल्या पुणे मेट्रो कामावरुन अजित दादांचा टोला
मला पंतप्रधान याना लक्षात आणून द्यायच आहे की काही मान्यवर व्यक्तीकडून अनावश्यक वक्तव्य केले जात आहेत ते महाराष्ट्राला परवडणारे नाही त्यामुळं याकडेही लक्ष द्यावे
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो.
भारताचं लाडकं नेतृत्व PM मोदींचं स्वागत
स्वत: मोबाईलवर तिकीट काढून मोदींनी प्रवास केला.
अनेक अडचणी असताना मेट्रोचं काम सुरु झालं.
विक्रमी वेळात मेट्रोचं काम पूर्ण
मोदीजी, पुण्यावर तुमचं खूप प्रेम आहे. नाशिकची निओ मेट्रो तुम्ही मंजूर केली आहे.
आज PM मोदी पुण्यनगरी पुण्यात आले आहेत. त्यांचं स्वागत करतो. मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल पुणेकरांचे आभार मानतो.
पुणे शहर वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम महाराजांची पुण्यभूमी पुणे आहे. शिवाजी महाराजांची आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची पुण्यभूमी पुणे आहे.
टिळक आणि सावरकरांची कर्मभूमी पुणे आहे. प्रत्येक पुणेकरासाठी हा आनंदाचा दिवस आहे.
मेट्रोचं स्वप्न आज खरं उतरलं. मेट्रोचा शुभारंभ आणि त्याचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते हा आनंदाचा क्षण आहे.
60 वर्षांनी पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान पुणे महापालिकेत येऊ शकले हे भाग्य आहे. गंगेनंतर मुळा आणि मुठाच्या योजनेचा शुभारंभ होतो आहे.
5 हजार कोटींच्या विकासकामाचं उद्घाटन होणार आहे.
PM मोदी MIT महाविद्यालयात दाखल
अजित पवार, देवेंद्र फडणवीस MIT महाविद्यालयात दाखल
महापालिकेच्या विविध योजनांचं उद्घाटन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन
पुणे मेट्रोला PM मोदींकडून हिरवा कंदील
PM मोदींनी काढलं मेट्रोचं तिकीट
आनंदनगर ते गरवारे कॉलेज पर्यंतचा मेट्रोचा 5 किमीचा टप्पा पूर्ण
PM मोदी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार; गरवारे स्थानकावर दाखल
थोड्याच वेळात PM मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन होणार
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून PM मोदींचा सत्कार करण्यात आला आहे. वादग्रस्त ठरलेला फेटा आणि शिवाजी महाराजांची सुबक मुर्ती देऊन केला सत्कार.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं केलं अनावरण; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुभाष देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित
थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार
PM मोदी पुणे महापालिकेत दाखल
काळ्या रंगाचा पेहराव असलेल्यानं नो-एंट्री
PM मोदी पुण्यात दाखल
केंद्रातील मोदी सरकार सातत्याने महाराष्ट्राचा द्वेष करत आहे. महाराष्ट्रातील महत्वाच्या संस्था गुजरातला हलवून महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणूनच सोशल मीडियावर #महाराष्ट्रद्रोहीमोदीपरत_जा म्हणून महाराष्ट्रातील जनता संताप व्यक्त करत आहे.
- बाळासाहेब थोरात
मोदींच्या शाही फेट्यावरची राजमुद्रा हटवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देण्यात येणाऱ्या शाही फेट्याला लावण्यात आलेली राजमुद्रा हटवण्यात आली. शाही फेटा याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या राजमुद्रेवरून अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शनिवारी या फेत्यावरून राजमुद्रा हटवून त्यावर सूर्यफूल लावण्यात आले आहे. यावरून कुठलेलंही राजकारण होऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात आली असल्याचे मुरुडकर फेटेवाल्यांकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र आणि दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे मोदींच्या हस्ते त्यांच्या पुतळ्याचे अनावरण हा केवळ एक दिखावा आहे. #महाराष्ट्रद्रोहीमोदीपरत_जा
- नाना पटोले
मार्ग व कार्यक्रम ठिकाणाना छावणीचे स्वरूप हजेरी लावतील
लोहगाव विमानतळ, विश्रांतवाडी, रेंजहिल्स परिसरातील सिंचननगर, गणेशखिंड रस्ता, जंगली महाराज रस्ता, महापालिका भवन, डेक्कन, गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक, कर्वे रस्ता, पौड रस्ता, एमआयटी कॉलेज, सेनापती बापट रस्ता येथे पोलिसांचा रविवारी पहाटे 4 वाजल्यापासून कडक बंदोबस्त आहे. विशेषत: लोहगाव विमानतळ, सिंचननगर, महापालिका भवन, गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक, आनंदनगर मेट्रो स्थानक, एमआयटी कॉलेज येथे अक्षरशः छावणीचे स्वरुप आले आहे. वाहतुक शाखा, पोलिस ठाणे, राज्य राखीव पोलिस दल, फोर्स वनच्या कंपन्या व २२०० पोलिसांचा कडक बंदोबस्त शहरात तैनात केला आहे
वरिष्ठ पोलिस अधिकारी, केंद्रीय तपास संस्थाचे अधिकारीही रस्त्यावर
पंजाब येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे. राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांचे या बन्दोबस्तावर लक्ष आहे. त्यादृष्टिने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी रविवारी पहाटेपासूनच बंदोबस्तच्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर केंद्रीय तपास संस्थाचे वरिष्ठ अधिकारी, पंतप्रधान यांचे विशेष सुरक्षा दल आदी विविध कार्यक्रम ठिकाणे व मार्गावर लक्ष ठेवून आहेत.
इमारतीवरुन टेहळणी, श्वान पथकांकडून कसून तपासणी
कार्यक्रम ठिकाणे व मार्गाजवळ असलेल्या ऊंच इमारती, मनोरे येथून पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहेत. ठिकठिकाणी बंदूकधारी पोलिस अधिकारी, कर्मचारी बन्दोबत करीत आहेत. याबरोबर गुन्हे शाखा, बॉम्ब शोधक व नाशक पथकातील श्वानांकडून ठिकठिकाणी कसुन तपासणी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविवारी पहाटे 4 वाजल्यापासूनच गणेशखिंड रस्ता, जंगली महाराज रस्ता व अन्य महत्वाच्या रस्त्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.ठिकठिकाणी पोलिसांचे समूह व निवडक पोलिस कर्मचारी मार्गावर बंदोबस्तवर आहेत. शहर पोलिस, राज्य राखीव पोलिसांसह केंद्रीय तपास संस्थाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कार्यक्रम ठिकाणाची कसुन तपासणी करण्यात येत आहे.
आमदार विश्वजीत कदम यांनी ट्विट करत म्हटलंय की, छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच जनतेचे रक्षण हाच आपला धर्म मानला आहे. मोदी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये देशांच्या मुलांना मृत्यूच्या दारात सोडून पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत. यामुळे पुणे शहर मोदीचा स्वागत #GoBackModi ने करत आहे. #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा असा हॅशटॅगही त्यांनी जोडला आहे.
मोदींच्या दौऱ्याला काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध
PM मोदींच्या दौऱ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आधीपासूनच विरोध दर्शवण्यात आला आहे. आजही या दौऱ्यावेळी आपला निषेध व्यक्त करण्यासाठी कॉंग्रेस अलका टॉकीज् चौकात आंदोलन करणार आहे तर राष्ट्रवादीकडून पुणे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यामधील वाहतूक मार्गातील प्रत्येक दुकानं बंद, हॉटेल्स देखील दुपारपर्यंत बंद असणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
पुणे मेट्रोच्या या उद्घाटनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर आता भाजपने प्रत्युत्तर देत म्हटलंय की, आदरणीय शरद पवारजी, पुणे मेट्रोचे काम अर्धवट आहे तर, लोकं झोपेत असताना लपून छपून ट्रायल तुम्हीच घेतलं होतं ना? आदरणीय तुमची अडचण इथे आहे की, "मोदीजी ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन करतात त्या प्रकल्पाचे लोकार्पण देखील करतात, जे तुम्हाला 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जमलं नाही"
पंतप्रधान मोदींना खास फेटा देऊन पुणेरी पाहुणचाराने सन्मानित करण्यात येणार आहे.
असा असेल दौरा
लोहगाव विमानतळावर १०.१५ वाजता आगमन
विमानतळावरून सिंचननगरपर्यंत हेलिकॉप्टरने प्रवास
सिंचननगर येथून कारने निघून १०.४५ ला पुणे महापालिकेत आगमन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
११.१० ला महापालिकेतून निघून गरवारे मेट्रो स्टेशनकडे रवाना
११.३५ पर्यंत मेट्रोचे उद्घाटन करून मेट्रोने आनंदनगर स्टेशनपर्यंत प्रवास करणार
११.४० ला आनंदनगर येथून एमआयटीच्या मैदानाकडे रवाना
१२ ते १ एमआयटी येथील कार्यक्रमासाठी उपस्थित (या कार्यक्रमासाठी नागरिकांनी दोन तास आधी उपस्थित राहावे)
१.४५ वाजता लवळे येथील सिंबायोसिस येथील कार्यक्रमाला उपस्थिती
२.३० वाजता विमानतळाकडे रवाना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.