PM narendra modi pune visit live youth congress Banners Manipur violence traffic Schedule  
पुणे

PM Modi Pune Visit : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी पुण्यात राजकीय वातावरण तापलं! विरोधात झळकले बॅनर्स

रोहित कणसे

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी (ता.1) पुणे दौऱ्यावर आहेत. यावळे पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते मेट्रोच्या नव्या मार्गिका सेवांचे उद्‌घाटन, पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांचे लोकार्पण, नव्या गृहप्रकल्पांची पायाभरणी यासह अनेक कार्यक्रमांना देखील ते उपस्थित राहाणार आहेत. दरम्याम मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर राजकारण तपताना दिसत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याआधीच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहयला मिळत आहे. पुण्यात युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

मणिपूर हिंसाचार प्रश्नावर संसदेत या विषयावर चर्चा न होणं यावरून युवक काँग्रेसने बॅनर्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणाा साधला आहे. "मन की बात बंद करो मणिपूर की बात करो" तसेच 'गो बँक क्राईम मिनिस्टर', "देश जळत असताना पुरस्काराच्या मेजवान्या कशासाठी?" असा मजकूर या बँनर्सवर दिसून येत आहे. त्यामुळे पुण्यात पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळी देखील विरोधकांकडून आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते पुणे दौऱ्यावर येत आहेत. या पुरस्कार प्रदान सोहळ्यच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यामुळे देखील या पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाहतुकीत असे असतील बदल

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर शहरातील वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, टिळक (अलका टॉकीज) चौक, टिळक रस्ता, देशभक्त केशवराव जेधे चौक,

गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन कॉलेज) रस्ता, संगमवाडी रस्ता, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रस्ता याठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात येतील. वाहनचालकांनी गैरसोय टाळण्यासाठी या मार्गांचा वापर टाळून इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टिळक रस्त्याने एस.पी. कॉलेज चौकात आल्यानंतर ना.सी. फडके चौकाकडे जाण्यासाठी (एस.पी. कॉलेज चौकातून) उजवीकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT