भाजपच्या महाराष्ट्रात निवडून आलेल्या काही मोजक्या खासदारांमध्ये समावेश झालेल्या पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे, त्याबाबत मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून अधिकृत संपर्क साधण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातून मोहोळ यांचेच नाव केंद्रीय मंत्रिमंडळात असणार आहे, तसेच मोहोळ यांची केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
राज्यात महायुतीला कमी जागा मिळाल्या, मात्र त्यामध्ये पुण्याची जागा शंभर टक्के भाजपला मिळणार, याची भाजपला खात्री होती. महायुतीचे उमेदवार व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तब्बल एक लाख २३ हजार इतके मताधिक्य मिळवीत विजयी झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. त्यामूळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला.
भाजपचे कोथरूडमध्ये भाजपचे नगरसेवक म्हणून अनेक वर्ष मोहोळ यांनी काम केले, मतदारांशी थेट संपर्क ठेवला. लोकांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता अशी ओळख निर्माण करणाऱ्या मोहोळ यांच्यावर विश्वास व्यक्त करीत भाजपने त्यांच्या गळ्यात पुण्याचे महापौर म्हणून जबाबदारी टाकली. मोहोळ यांनीही पक्षाच्या नेत्यांचा विश्वास सार्थ करत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली.
विशेषतः कोरोनामध्ये मोहोळ लोकांच्या मदतीसाठी धावून गेले. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखीनच वाढ होत गेली. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, मॅरेथॉन अशा वेगवेगळ्या उपक्रम उपक्रमांद्वारे लोकांचे व पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेतले.
दरम्यान या सगळ्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेत मोहोळ यांच्या गळ्यात पुणे लोकसभा उमेदवारीची माळ घातली.पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा विश्वास सार्थ करत मोहोळ यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या दांडज्ञा जनसंपर्काचा फायदा घेत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा मोठ्या मताधिकेने पराभव करत विजय खेचून आणला.
मोहोळ हे स्वतः पहिलवान आहेत, कुस्तीसह वेगवेगळ्या खेळांची मोहोळ यांना चांगली माहिती आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवून त्यांनी आपल्यातील खेळाडूची चुणूक दाखवून दिली. चांगले खेळाडू असलेल्या मोहोळ यांना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
पुण्याचे लोकांमधून निवडून आलेले खासदार सुरेश कलमाडी यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपद होते. तत्कालीन राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर यांच्याकडेही काही काळ मंत्रीपद होते. मात्र कलमाडी यांच्यानंतर थेट दहा वर्षांनी लोकांमधून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड होत असल्याने पुणेकरांच्या आनंदात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.