पुणे : पिंपरी-चिंचवडमधील लाचखोरीचे प्रकरण गाजत असतानाच सोमवारी पुणे महापालिकेच्या उपअभियंताही 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. महापालिकेच्या शाळा दुरूस्तीचे बिल काढण्यासाठी अधिकाऱ्याने लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. (Pune News)
सुधीर विठ्ठलराव सोनवणे (वय 51) असे उपअभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी 2018-19 या कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या शाळा दुरूस्तीचे काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे मिळावेत, यासाठी त्यांनी उपअभियंता या पदावर कार्यरत असणाऱ्या सोनवणे यांच्याकडे अर्ज केला होता.
त्यासाठी त्यांनी सोनवणे यांची भेटही घेतली होती. मात्र सोनवणे यांनी संबंधीत कामाचे बील मंजुर करण्यासाठी आणि दुसऱ्या कामाचे बील काढून दिल्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यांच्यामध्ये झालेल्या तडजोडीनंतर 40 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते.
दरम्यान, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांनी संबंधीत प्रकरणाची पडताळणीही केली. सोमवारी दुपारी महापालिकेच्या पार्कींग परिसरामध्ये सोनवणे यास तक्रारदाराकडून 40 हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोनावणे यास ताब्यात घेतले. पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अतिरीक्त पोलिस अधिक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने हि कारवाई केली. पोलिस निरीक्षक भारत साळुंखे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.