पुणे - पीएमपीच्या ब्रेकडाउन बसला आग लागल्याची घटना नाना पेठेतील मॉडर्न बेकरी चौकात मंगळवारी सायंकाळी घडली. बसने पेट घेतल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला थांबविल्यामुळे त्यात कोणी जखमी झाले नाही.
पीएमपीची ही ब्रेकडाउन बस रस्त्यात बंद पडलेली बसच्या दुरुस्तीसाठी निघाली होती. या बसमध्ये चार कामगार होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बस नाना पेठेतील मॉडर्न बेकरी चौकात आली. त्यावेळी बसने समोरून पेट घेतल्याचे चालक अनिल कडू यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने बस रस्त्याच्या बाजूला थांबवली. त्यानंतर बसमधील कामगार सुखरूप बाहेर पडले.
बसचालकाने ही बाब अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षात कळवली. ही माहिती मिळताच अग्निशामक दलाचे स्टेशन ड्यूटी अधिकारी पंकज जगताप, जवान छगन मोरे, सूरज तारू, हर्षद सोनवणे, नेवसे, चालक राजेश शेलार घटनास्थळी पोचले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
या दुर्घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. परंतु शॉर्टसर्किटमुळे ठिणगी पडून बसने पेट घेतला असण्याची शक्यता अग्निशामक दलाचे अधिकारी जगताप यांनी व्यक्त केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.