पुणे

पुणे : चांदणी चौकात पीएमपी-ट्रकचा अपघात; वाहतूक संथ गतीनं सुरु

अपघातग्रस्त दोन्ही वाहनं सध्या रस्त्यावरुन दूर करण्यात आली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

खडकवासला : चांदणी चौकात पीएमपी बस आणि ट्रकची एकमेकाला धडक लागून झालेल्या अपघातामुळं बसचं मोठ नुकसान झालं आहे. दरम्यान साताऱ्याकडे जाणारी वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. त्यामुळं कोथरुडकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. पण आता दोन्ही अपघातग्रस्त वाहनं दूर करण्यात आली असून वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. (PMP bus truck accident at Chandni Chowk Pune Traffic started at slow speed)

सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरु हायवेवरील चांदणी चौकातील प्रथमेश एलाईट इमारतीसमोर शुक्रवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास पीएमटी व ट्रकची एकमेकाला धडक बसल्यानं मोठा अपघात झाला होता. यामुळं साताऱ्याला जाणारा रस्ता सुमारे दोन तास पूर्ण बंद झाला होता. परिणामी साताऱ्याला जाणारी वाहतूक बावधन बाजूला ठप्प झाली होती. परिणामी मुळशी, पाषाण बावधन बाजूने कोथरूडला वाहनं येऊ शकत नव्हती त्यामुळं शहरातील नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

दरम्यान, काही वेळातच वारजे वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर दोन्ही वाहनं रस्त्यावरुन हटवण्यात आल्यानं आता वाहतूक संथगतीनं सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT