pune double decker sakal
पुणे

Double Decker Bus : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पीएमपीच्या ताफ्यात पुन्हा डबलडेकर

डबलडेकर बस खरेदी करण्याच्या पीएमपीच्या प्रक्रियेला अखेर दीड वर्षाच्या खंडानंतर मुहूर्त मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - डबलडेकर बस खरेदी करण्याच्या पीएमपीच्या प्रक्रियेला अखेर दीड वर्षाच्या खंडानंतर मुहूर्त मिळाला आहे. पुढील आठवड्यापासून निविदाप्रक्रिया सुरू होईल. २० डबलडेकरसह १०० ई-बसची खरेदी करण्यात येईल.

डिसेंबर २०२२ मध्ये ओमप्रकाश बकोरिया अध्यक्ष असताना बसखरेदीचा निर्णय झाला होता. त्यास संचालक मंडळाने मंजुरीही दिली होती. मात्र त्यानंतर सारे ठप्प झाले. बस प्रत्यक्ष धावण्यासाठी आणखी किमान सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन डबलडेकर बस सेवा सुरु करायचा निर्णय झाला होता. पहिल्या टप्यात २० बस घेतल्या जातील. या बस ‘बीआरटी’ मार्गावरून धावणार नाहीत.

प्रति किमीसाठी सहा रुपये

इलेक्ट्रिक बस एक किलोमीटर धावण्यासाठी अवघे सहा रुपये खर्च येतो. मात्र ठेकेदाराच्या बसला प्रतिकिमीसाठी ५० ते ६० रुपये द्यावे लागतात. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने स्वतः मालकीच्या बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. यासाठी पीएमपी बँकांकडून कर्ज घेणार आहे. याशिवाय पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमआरडीए यांच्याकडूनही आर्थिक साहाय्यही घेण्यात येईल.

कशी असेल नवी डबलडेकर?...

  • नव्या बसला दोन जिने (जुन्या बसला एकच जिना)

  • इलेक्ट्रिक व वातानुकूलित

  • उत्तम सस्पेन्शनमुळे प्रवास आरामदायक

  • डिजिटल तिकिटाची बसमध्येच सुविधा

  • बसचा ‘लुक’ लंडनमध्ये धावणाऱ्या बससारखा

प्रवासी क्षमता जास्त

  • आसन - ७० पर्यंत, उभे ४०

  • एकाच वेळी किमान शंभरपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकणार. त्यामुळे जास्त बसची अथवा फेऱ्यांची गरज भासणार नाही

  • बसची उंची : १४ फूट ४ इंच असल्याने मेट्रोच्या स्थानकाचाही अडसर येणार नाही.

  • पूर्वी पीएमपीच्या ताफ्यात ‘एसएलएफ’ प्रकारची डबलडेकर बस होती, जिच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च जास्त होता

  • नवी इलेक्ट्रिक असल्याने देखभालीचा कमी असणार

  • एका बसची किंमत : २ कोटी रुपये

पीएमपीची वाटचाल

  • एकूण बस संख्या : १६५०

  • रोजचे प्रवासी : १२ लाख (सरासरी )

  • प्रवासी उत्पन्न : १ कोटी ५० लाख (सुमारे )

  • रोजचा प्रवास : ३ लाख ६० हजार किमी.

  • एकूण मार्ग : ३७०

  • एकूण बस थांबे : ४,३००

पीएमपी स्वःताच्या मालकीच्या १०० इ बस घेईल. यात २० डबलडेकर असतील. पुढील आठवड्यापासून निविदा प्रक्रियेला सुरवात होईल. या प्रक्रियेसाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

- नितीन नार्वेकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT