पुणे - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास आळंदी व देहू येथे राज्यभरातून भाविक येतात. अशा प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने बसच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. ३० जूनपर्यंत आळंदीला जाण्यासाठी स्वारगेट, महापालिका, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून दररोज १०६ बसची वाहतूक होणार आहे.
तसेच देहूसाठी पुणे स्टेशन, महापालिका, निगडी येथून ३० बस सोडल्या जाणार आहेत. ३० जूनला आळंदीहून पालखीचे प्रस्थान होणार असून, पहाटे अडीचपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, पुणे महापालिका या ठिकाणावरून आळंदीसाठी २७ बसची व्यवस्था केली आहे.
२ जुलै रोजी पुण्याहून पालखीचे प्रस्थान होणार आहे. महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी आदी ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पूर्णत: बंद राहणार आहे. दिवेघाटाऐवजी बोपदेव घाटामार्गे बससेवा सुरू राहणार आहे. स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर या मार्गावर ६० जादा बसचे नियोजन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.