पिंपरी - पुण्यातून कासारवाडी, नाशिक फाटामार्गाने भोसरीला जाणाऱ्या बसचा मार्ग वल्लभनगर, तसेच निगडीला जाणाऱ्या बसचा मार्ग मासुळकर कॉलनीमार्गे केल्यास नागरिकांची सोय होईल. त्यामुळे हे मार्ग बदलावेत, अशी मागणी आहे.
भोसरीला जाणाऱ्या बसपैकी पंधरा टक्के बस जर वल्लभनगर एसटी स्टॅंड, वायसीएम, महेशनगर, नेहरूनगर, मनीष गार्डन, मगर स्टेडियम, यशवंतनगर, निगडी-भोसरी रस्त्याने भोसरीला तसेच वंडरकार, टेल्को मटेरिअल गेट, स्पाइन रोड, संतनगर, आरटीओपर्यंत आणि निगडीला जाणाऱ्या अजून काही बस मासुळकर, अजमेरामार्गे सोडण्याची व्यवस्था करावी.
सरासरी दर तीन ते चार मिनिटांनी एक बस या मार्गाने भोसरीला जाते. शिवाय कासारवाडी, नाशिक फाट्यानंतर लांडेवाडीपर्यंत विशेष प्रवासी नसतात. त्याच काही बस वरील मार्गाने वळविल्यास लोकांना भोसरी व चाकण एमआयडीसीमध्ये कामाला जाण्यास तसेच या भागातील लोकांना पुणे, भोसरी व वल्लभनगर एसटी स्थानकाला जाण्यासाठी बस उपलब्ध होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.