PMPML-BUS sakal
पुणे

ग्रामीण मार्गांवरील बसमार्गामुळे प्रवास सुखकर

कात्रजवरून नवीन बस; पीएमपीएलही फायद्यात

अशोक गव्हाणे

कात्रज : कात्रज डेपोतून ग्रामीण भागात नव्याने सुरु झालेल्या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर झाला असून पैशांचीही बचत होत आहे. त्याचबरोबर या नवीन मार्गांवर चालणाऱ्या बसेसमुळे पीएमपीएललाही (PMPML)अर्थिक फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

कात्रज डेपोतून जून महिन्यात कात्रज ते विंझर, तर काही दिवासंपूर्वी कात्रज ते सारोळा, कात्रज ते बालाजी मंदिर केतकवळे हे मार्ग चालू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, मार्ग क्रमांक २२८ कात्रज ते वडगाव मावळ हा मार्ग चालू केल्याने वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे भागांतील नागरिकांना थेट कात्रजपर्यंत बससेवा उपलब्ध झाली आहे. तर २५ ऑगस्टपासून बस क्रमांक २९६ (अ) कात्रज ते वांगणी बससेवा सुरु झाली. या मार्गाचे अंतर ४४ किमी असून तिकीटदर ५० रुपये आहे. अशाप्रकारे मागील काही दिवसांत कात्रजवरून नव्या पाच मार्गांवर थेट बससेवा चालू असून प्रवाशांकडूनही याला उत्स्फुर्द प्रतिसाद मिळत आहे.

मोठ्या प्रमाणांवर बसच्या फेऱ्या होत असल्याने बसची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे प्रवाशांत आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी या मार्गावर दैनंदिन किंवा मासिक पासची सेवाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

PMPML

प्रतिक्रीया

ग्रामीण भागात सर्व प्रवाशांना पीएमपीएलकडून उत्तम सेवा दिली जात आहे. मार्ग सुरू झाल्यापासून सदर मार्गावर एकही ब्रेकडाऊन झाले नसल्याने ब्रेकडाऊन विरहित प्रवासीसेवा दिली जात आहे. त्यामुळे सर्व मार्गावर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून याचा ग्रामीण भागातील प्रवाशांना आणि पीएमपीएललाही फायदा होत आहे.

- विजय रांजणे, आगारप्रमुख, कात्रज.

भोर, वेल्हा, मावळ, पुरंदर हे तालुके पुणे शहराच्या अगदी जवळ असताना सुद्धा मागे पडल्याचे दिसत आहेत. हे तालुके पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. तालुक्यांच्या विकासाच्या दृष्टीने दळणवळाची साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे असून पीएमपीएलने ती उपलब्ध करुन देण्यास सुरवात केले आहे. याचा स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होत असून त्याचा आनंदही आहे.

- सुरेखा जाधव, प्रवासी, खांबवडी-विंझर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT