ajit pawar Sakal Media
पुणे

"PMRDAच्या पायाभूत सुविधांचं महापालिकेकडं होणार हस्तांतरण"

पालिकेचे अधिकार काढून घेतेलेले नसल्याचं बैठकीत अजित पवारांकडून स्पष्टीकरण

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : तेवीस गावांबाबत PMRDA नं जे केलं आहे ते सर्व महापालिकेकडे हस्तांतर होणार आहे. त्यामुळं त्यांचे अधिकार कोणी काढून घेतलेले नाहीत. दोन्ही महापालिका भाजपच्या ताब्यात असल्या तरी विकासाबाबत राजकारण केलं जातं नाही, याबाबत मुख्यमंत्रीही सकारात्मक आहेत. जिथं राजकारण करायच आहे. तिकडे सगळे राजकारण करू पण जिथं जनतेचा प्रश्न आहे, तिकडे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र काम केलं पाहिजे, असेही पवार म्हणाले. पुणे महानगर नियाजेन समितीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या प्रारुप विकास आराखड्यावर आज पवार यांच्या उपस्थितीत सादरीकरण झालं, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले,"पीएमआरडीएच्या विकास आराखड्या संदर्भात आमदारांच्या काही सूचना होत्या. त्यासाठी याबैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्यामध्ये त्यांच्याकाही चांगल्या सूचना आल्या आहेत. ज्या पीएमआरडीएच्या स्तरावर अंमलात आणता येतील, त्यांची दुरूस्ती येथेच करता येईल. तर ज्या राज्य सरकारची मान्यता लागेल, त्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सोडविण्यात येतील.

भविष्यात महापालिका अस्तित्वात आणावी लागेल

दरम्यान, या बैठकीत स्वतंत्र महापालिकेच्या संदर्भातही काही सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित केले. पुणे महापालिकेच्या पूर्व भागातील हडपसरसाठी स्वतंत्र महापालिकेची तसेच चाकण, राजगुरूनगर भागात लोकसंख्या वाढत आहे. विशेषत: पिंपरी-चिंचवड नदी पलीकडचा भाग. पुढे या भागातील लोकसंख्येचा विचार करता भविष्यात महापालिका अस्तित्वात आणावी लागेल. परंतू त्यासाठी ज्या गोष्टी लागतात. जसे तालुक्याचे रूपांतर जिल्ह्यात करताना अनेक पायाभूत सुविधा पुरवाव्या लागतात. तसेच भविष्याचा विचार करून त्या दृष्टीने तयारी करावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

राणेंबाबत बोलायचं नाही, देशमुखांबाबत रिपोर्ट आल्यावर भाष्य

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत विचारले असता, अजित पवार म्हणाले, ‘‘राणेबाबत मला चर्चा करायची नाही. आम्हाला सरकार चालवायचं आहे, ते केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी त्यांच काम करावं’’ तसेच अनिल देशमुख यांच्याबद्दल पवार म्हणाले, ‘‘अनिल देशमुखांबाबत मला रिपोर्ट मिळालेला नाही. जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत मी त्यावर बोलणार नाही" अनेक चौकशा होत असतात त्यावेळी सगळेच चौकशीसाठी मदत करत असतात. त्यामुळे यावर मी बोलणार नाही’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT