इंदापूर : कळस येथील जिल्हा परिषद वायसेवाडी शाळेचा ऑनलाइन वर्ग आज सुरू झाला तो एका वेगळ्याच प्रकारे. कारण आज ऑनलाइन तासाला केवळ गुरुजी कविता शिकवणार नव्हते, तर ज्या कवींनी ती कविता लिहिली ते कवीच थेट मुलांशी संवाद साधणार होते.
इयत्ता तिसरीला रानकवी तुकाराम धांडे यांची रानवेडी ही कविता आहे. ही कविता मुलांना शिकवण्यापूर्वी या कवींनाच ऑनलाइन आमंत्रित करण्याची कल्पना शिक्षक अनिल शिंदे यांना सुचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात साकारली. बालचमूंना थेट कविता शिकविण्याची संधी कवी तुकाराम धांडे यांनीही दवडली नाही. त्यांनी मुलांशी संवाद साधण्याचे ठरविले व ऑनलाइन तासात सामील झाले.
याबाबत शिक्षक अनिल शिंदे म्हणाले, कवी शब्द सृष्टीचा ईश्वर असतो. म्हणूनच जे न देखे रवी, ते देखे कवी.. असे म्हटले जाते. याचा प्रत्यय शाळेतील सर्व मुलांनी घेतला. कवी तुकाराम धांडे जेव्हा त्यांचीच कविता मुलांना त्यांना अभिप्रेत असणाऱ्या अर्थासह सांगू लागले, तेव्हा मुले तल्लीन होऊन ऐकत होती.
या ऑनलाइन तासाला इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, केंद्रप्रमुख दिलीप बोरकर व मुख्याध्यापक महादेव पवार यांनीही उपस्थिती लावली. शिक्षक अनिल शिंदे यांच्यासोबत कैलास वणवे, राजेंद्र बोरावके, मारुती दराडे, रवींद्र शेलार, संतोष ननवरे या सहकारी शिक्षकांनीही हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.