police arrested who rapped obscenely in pune university offensive video crime  sakal
पुणे

Pune : विद्यापीठात अश्र्लील रॅप करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, बनवला होता आक्षेपार्ह व्हिडीओ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात अश्र्लील ‘रॅप’चे चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई

सम्राट कदम

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात अश्र्लील ‘रॅप’चे चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठातील मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये विनापरवानगी शिव्या देऊन रॅप सॉंगचे चित्रीकरण केल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी मोठी कारवाई केली.

रॅप साँगमध्ये दिसणाऱ्या तसेच चित्रीकरणात सहभागी असलेल्या काही तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी पोलीसांकडे तक्रार केली होती.

विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे सहायक सुरक्षा अधिकारी सुधीर दळवी यांनी याप्रकरणी पोलीसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या मदतीनेच पोलिसांनी वसतिगृहातून एकाला ताब्यात घेतले. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने सुत्र हलवत दोषींना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली. शुक्रवारी दुपारपर्यंत बहुतेक दोषींना पोलिसांनी पकडल्याचे समजते.

विद्यापीठाच्या ऐतिहासिक मुख्य इमारतीच्या परिसराचा वापर अनधिकृतपणे चित्रीकरण करण्यासाठी व त्यात तलवार पिस्तूल मद्याची बाटली अश्लील शब्दांचा वापर केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी व इतर व्यक्तींना भडकावणे, मनात लज्जा उत्पन्न होईल अशा शब्दांचा वापर केल्याचे दिसून येत आहे.

सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण करणारे, दहशत पसरविणारे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बदनामी करणारे चित्रीकरण या रॅप सॉंग मध्ये करण्यात आल्याने विद्यापीठाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती.

त्यावर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रॅपवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्षेप घेतला होता. तसेच तीव्र शब्दात निषेध नोंदवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारातील काही चित्रफिती अनधिकृतपणे वापरत काही व्यक्तींनी आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले असून, ते समाज माध्यमांमध्ये प्रसारित केल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशा प्रकारचे आक्षेपार्ह छायाचित्रण विद्यापीठाची परवानगी न घेता करणे ही बाब आक्षेपार्ह व गंभीर स्वरूपाची आहे. विद्यापीठ अशा कृत्याचा तीव्र निषेध करीत आहे. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT