Crime esakal
पुणे

Pune Crime : पोलिस आयुक्तांचा आक्रमक पवित्रा; १५९ सराईत गुन्हेगारांना अटक

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरात वाहनांची तोडफोड, दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांची कुंडलीच तयार करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरात वाहनांची तोडफोड, दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांची कुंडलीच तयार करण्यात आली असून, त्याच्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, पोलिसांनी सोमवारी (ता. ३) मध्यरात्री शहरात विविध भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवून १५९ सराईत गुन्हेगारांना अटक केली.

शहरात गुंड टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड, दहशत माजविणाच्या घटना होत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हे शाखा आणि सर्व पोलिस ठाण्यांना गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यांतील पथकांनी ४५५ हॉटेल, लॉजेस, ढाबे, एस. टी. बस स्थानके, रेल्वे स्टेशनसह ८५ सार्वजनिक ठिकाणी संशयितांची कसून तपासणी केली. तीन जुलै रोजी रात्री दहा वाजल्यापासून चार जुलैच्या पहाटे दोन वाजेपर्यंत हे कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या विशेष मोहिमेदरम्यान आर्म ॲक्टनुसार ११ आरोपींना अटक करुन एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि १० हत्यारे जप्त करण्यात आली. शिवाजीनगर, भारती विद्यापीठ, खडकी, विश्रांतवाडी, चतुःशृंगी, चंदननगर, येरवडा, विमानतळ, लोणीकंद, हडपसर, मुंढवा आणि कोंढवा पोलिसांकडून गुन्हेगारांना वॉरंट बजावण्यात आले.

शहरातील पोलिस ठाण्यांकडून २८ ठिकाणी नाकाबंदी करून तीन हजार २८२ संशयित वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४७५ जणांवर एक लाख २२ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

वाहतूक शाखेकडून एक हजार १२९ संशयित वाहनचालकांना तपासण्यात आले. त्यापैकी ४९६ जणांकडून चार लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच, गुन्हे शाखेकडून १३ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त (पूर्व) प्रवीण पाटील, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम) रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त (वाहतूक) विजयकुमार मगर यांच्यासह अन्य पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT