Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime News : वंडरसिटी परिसरात पोलिसांकडून चोरट्यांवर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पोलिसांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांच्या दिशेने पोलिसांनी गोळीबार केला. ही घटना नवले पुलाजवळ वंडरसिटी परिसरात मध्यरात्री घडली.

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रतिकांत कोळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक कोळी यांच्यासह पोलिसांचे पथक रविवारी मध्यरात्री नवले पूल परिसरात गस्तीवर होते.

त्यावेळी वंडरसिटी भागात दोघेजण मोटारीतील डिझेल काढून घेत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांना पाहताच दोघे तरुण मोटारीतून पळून जात होते. पोलिस उपनिरीक्षक कोळी यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांनी पोलिसांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी उपनिरीक्षक कोळी यांनी प्रसंगावधान राखत चोरट्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर चोरटे नवले पुलाच्या दिशेने पसार झाले. या घटनेत कोणी जखमी झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT