वाहनांची तोडफोड करीत माजवली दहशत
वाहनांची तोडफोड करीत माजवली दहशत  sakal
पुणे

Pune : वर्चस्ववादातुन दहशत निर्माण करीत वाहने फोडणाऱ्या टोळीविरुद्ध "मोका" कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे - स्वतःच्या टोळ्यांचे गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दहशत निर्माण करुन सर्वसामान्य नागरीकांच्या तब्बल 19 वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्याअंतर्गत (मोका) कारवाई करुन चांगलीच वेसन घातली आहे.

मागील आठवड्यात वडारवाडीतील पांडवानगर परिसरात वाहन तोडफोडीची घटना घडली होती. दरम्यान, पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी आता वाहन तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध "मोका'चा बडगा उगारला आहे.

टोळी प्रमुख अजय विटकर (वय 25), रुपेश उत्तम विटकर (वय 25, रा. पांडवनगर) इस्माईल इब्राहीम शेख (वय 20), गणेश हरीश्‍चंद्र धोत्रे (वय 19, रा. वडारवाडी), साहिल गणेश विटकर (वय 20), लवकुश रामाधीन चौव्हाण (वय 22),

विजय उर्फ चपात्या हनुमंता विटकर (वय 21), चेतन उर्फ आण्णा राजू पवार (वय 22), अनिल उर्फ काळ्या हनुमंत डोंगरे (वय 21), विजय चंद्रकांत विटकर (वय 19) यांच्यासह इतर अशी "मोका'नुसार कारवाई झालेल्यांची नावे आहेत. आरोपींनी संगनमताने टोळी तयार करून परिसरात दहशत माजविली होती.

संशयित आरोपी विटकर व त्याच्या साथीदाराने 17 एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजता पांडवनगर येथे शिवीगाळ करत लाकडी दांडके व लोखंडी हत्याराने चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड केली. आरोपींनी एकूण 19 वाहनांची तोडफोड केली. तर, एकाला मारहाण करून गंभीर जखमी केले होते. "आम्ही इथले भाई आहोत,

अशा शब्दात नागरीकांना धमकी देत दहशत निर्माण केली. आरोपी संघटीतपणे टोळी तयार करून परिसरात गुन्हे करत होते. त्यांच्याविरोधात वाहनांची तोडफोड, जबरी चोरी, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे आदींसारखे गुन्हे दाखल आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित संशयित आरोपींवर "मोका' नुसार कारवाई करण्यात यावी,

याबाबतचा प्रस्ताव चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी तयार केला. हा प्रस्ताव पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यामार्फत पुर्व प्रादेशिक विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी संबंधित प्रस्तावाला मंजुरी दिली. रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही 23 वी "मोका'ची कारवाई आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: टीका झाली, पण भिडू घाबरला नाय! फायनलमध्ये दुबेने दाखवली बॅटची ताकद

Ind vs Sa T20 WC Final Live Score : भारताची दणक्यात सुरुवात! हेंड्रिक्सपाठोपाठ द. आफ्रिकेचा कर्णधारही बाद

Virat Kohli : टी 20 वर्ल्डकपच्या फायनलचा किंग! विराटच्या संथ अर्धशतकानं पकडला वेग, रोहितचा विश्वास ठरवला सार्थ

SBI News : 'एसबीआय'ला नवीन चेअरमन; दिनेश खारांच्या जागी 'यांना' संधी? कशी होणार निवड?

Rishabh Pant: 'डक'वर आऊट होणाऱ्या पंतची लज्जास्पद कामगिरी! टी20 वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासात नोंद झाली विकेट

SCROLL FOR NEXT