योगेंद्र यादव sakal
पुणे

राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही : योगेंद्र यादव

विद्यापीठात राज्यशास्त्र विभागातर्फे व्याख्यान

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘प्राचीन काळात राजकारणाचा अर्थ फार मर्यादित होता. त्या-त्या वेळच्या राजांनी आपले साम्राज्य वाढविण्याच्या दृष्टिकोन ठेऊन केलेली नीती म्हणजे राजकारण होते. मात्र आताच्या काळातील राजकारण हे व्यापक स्वरूपाचे असून यातील प्रत्येक घटक या राजकारणाचा भाग झालेला आहे. त्यामुळेच राजकारण हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता किंवा केवळ सत्ता मिळविण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो व्यापक झाला आहे,’’ असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव (yogendra yadav) यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (sppu) राज्यशास्त्र विभागाने ऑनलाइन व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. मंगेश कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक श्रीरंजन आवटे आणि राज्यशास्त्र विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

यादव म्हणाले, ‘‘राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यापुरते मर्यादित नसून सामाजिक सक्रियता, विधायक कार्य, शैक्षणिक, राजकीय आणि अध्यात्म या गोष्टी एकत्रितरीत्या करणे म्हणजे राजकारण आहे. राजकारण हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहिला नाही तर तो व्यापक झाला आहे.’’ व्याख्यानानंतर विद्यार्थी आणि प्राध्यापकांची प्रश्नोत्तरांची फेरीही घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

Imtiaz Jaleel : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतांच्या फुटीचा जलील यांना फटका

Devendra Fadnavis : फडणवीस यांचा विजयी ‘षटकार’

SCROLL FOR NEXT