Manorama Khedkar Parents Esakal
पुणे

Pooja Khedkar Case : खेडकर दांपत्याच्या बंगल्याची ग्रामीण पोलिसांकडून झडती; पिस्तूल, तीन काडतुसे व लॅंड क्रुझर कारही जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनोरमा खेडकर यांच्या बाणेरमधील बंगल्याची शुक्रवारी ग्रामीण पोलिसांनी झडती घेतली. यावेळी खेडकर यांनी शेतकऱ्याला धमकाविण्यासाठी वापरलेले पिस्तूल, तीन काडतुसे व लॅंड क्रुझर ही आलिशान कारही जप्त केली.

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यासह वडील दिलीप खेडकर, अंगरक्षकासह सात जणांविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी शेतकरी पांडुरंग कोंडिबा पासलकर (वय ६५, रा. केडगाव पुनर्वसन, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री मनोरमा खेडकर यांना महाड येथून अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, शुक्रवारी ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने खेडकर यांच्या बाणेर येथील नॅशनल हाउसिंग सोसायटीतील बंगल्याची झडती घेतली.

पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या समक्ष बंगल्यातून शेतकऱ्याला धमकाविण्यासाठी वापरलेले पिस्तूल, तीन काडतुसे जप्त केली. संबंधित घटना घडली, त्यावेळी खेडकर या त्यांच्या लॅंड क्रुझर या आलिशान गाडीने तेथे गेल्याचे चित्रफितीमध्ये दिसून आले होते. त्यामुळे पोलिसांनी खेडकर यांनी आलिशान गाडीही जप्त केली. दरम्यान, ग्रामीण पोलिसांकडून बंगल्याची झडती सुरू चतु:शृंगी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शस्त्र परवानाप्रकरणी पुणे पोलिसांची नोटीस

मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिला होता. हा परवाना देताना, त्यांना घालण्यात आलेल्या अटी व शर्तींचा खेडकर यांनी भंग केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी खेडकर यांना आपला शस्त्र परवाना रद्द का करू नये, अशी नोटीस बजावली आहे. खेडकर यांनी दहा दिवसांच्या आत खुलासा करावा, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT