युपीएससी परीक्षा प्रक्रियेदरम्यान घोटाळ्यामुळं चर्चेत आलेली आणि युपीएससीकडून उमेदवारी रद्द झालेल्या पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर झाला आहे. मनोरमा यांनी पौड इथं पिस्तूल दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी त्यांना काही दिवसांपूर्वी अटक झाली होती.
साम टीव्हीच्या वृत्तानुसार, मनोरमा खेडकर यांच्याविरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्यांना अटकही केली होती, तसंच त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, दोन दिवसांपासून त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी सुरु होती. ही सुनावणी आज पूर्ण झाली आणि कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला.
दरम्यान, पौड येथील शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात पौड पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस त्यांच्या मागावर होते. त्यानंतर नाट्यमयरित्या त्यांना अटक करण्यात आली होती.
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी गावातील एका हॉटेलमध्ये त्या नाव बदलून थांबल्या होत्या. इंदुबाई ढाकणे असं नाव त्यांनी या हॉटेलमध्ये दिलं होतं. आपली ओळख पटवण्यासाठी त्यांनी या नावाचं बनावट आधारकार्डही हॉटेलच्या स्टाफकडं सादर केलं होतं. या हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी पहाटे अडीच वाजता इथं छापा मारुन त्यांना १७ जुलै रोजी अटक केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.