Pune Porsche Accident  esakal
पुणे

Porsche Car Accident : डॉ. हळनोरने विद्यार्थ्याकडे ठेवली अडीच लाखांची रोकड

कल्याणीनगरमधील पोर्श मोटार अपघात प्रकरणातील मुलाच्या रक्ताचा नमुना बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हाळनोरने घेतलेले पैसे महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याकडे ठेवण्यासाठी दिले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कल्याणीनगरमधील पोर्श मोटार अपघात प्रकरणातील मुलाच्या रक्ताचा नमुना बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हाळनोरने घेतलेले पैसे महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. डॉ. अजय तावरे यांच्यामुळे मला हे पैसे मिळाले आहेत. माझ्याकडे कपाट नसल्याने तुझ्याकडे ठेव. मी १५ दिवसांनंतर ते घेईन, असे डॉ. हाळनोरने सांगितले होते, असे त्या विद्यार्थ्यांने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयात दिली.

विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयासमोर शुक्रवारी पोर्श कार अपघात प्रकरणाची सुनावणी झाली. डॉ. हाळनोरने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यांकडे ते पैसे ठेवण्यास दिले. त्यावेळी विद्यार्थ्याने विचारले असता, डॉ. हाळनोरने ‘नंतर सांगतो काळजी करू नको. काही चुकीचे केलेले नाही,’ असे सांगत विद्यार्थ्यांकडे अडीच लाखांची रोकड दिली. त्यानंतर विद्यार्थाने ती कपाटात ठेवून दिली, ही बाब अ‍ॅड. हिरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, अमर गायकवाड आणि अश्पाक मकानदार येरवडा कारागृहात आहेत. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे युक्तिवाद करीत आहेत. त्यांना अ‍ॅड. सारथी पानसरे साहाय्य करीत आहेत.

युक्तिवादादरम्यान अ‍ॅड. हिरे म्हणाले, अपघाताच्या दिवशी प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाला अपघातग्रस्त पोर्श गाडीमधून बाहेर काढले तेव्हा तो उभे राहण्याच्या स्थितीत नव्हता. मात्र, डॉ. हळनोरने तो मुलगा मद्याच्या अमलाखाली नव्हता असे अहवालात नमूद केले आहे. ससून रुग्णालयातील डिव्हीआरमध्ये डॉ. हाळनोर, अल्पवयीन मुलगा, शिवानी अग्रवाल, त्याचे वडील, साक्षीदार महिला उपस्थित असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. अल्पवयीन मुलाऐवजी समान रक्तगट असलेल्या आणि विशाल अग्रवाल याच्या मित्राचे ते रक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरने दिलेल्या जबाबानुसार, डॉ. हाळनोरने मुलाच्या आईचे रक्त घेण्यास सांगितले होते. त्यानुसार त्या महिलेचे रक्त घेतले. अन्य एका डॉक्टरने इतर मुलांचे रक्ताचे नमुने न घेता दुसऱ्यांचेच घेतले. अर्थात डॉ. हाळनोरने त्या डॉक्टरांना तसे करण्यास सांगितले होते. रक्ताची अदलाबदल डॉ. तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्या सांगण्यानुसार करण्यात आली, असे हिरे यांनी न्यायालयास सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; 'या' नव्या चेहऱ्यांना संधी

Vikhe-Thorat Controversy: विखे-थोरात वाद टोकाला! "नीच लोकांना...."; सत्यजीत तांबे आक्रमक!

Ambabai Temple : अंबाबाई चरणी तब्बल एक कोटी 14 लाखांचं दान; मंदिर आवारातील 12 देणगीपेट्यांतील मोजणी पूर्ण

Navi Mumbai: नवी मुंबईत भीषण अपघात; डम्परला कार धडकली, दोघांचा मृत्यू!

Sakal Podcast: रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती ते तालिबानमध्ये टीव्हीवर दिसणार नाहीत जिवंत प्राणी

SCROLL FOR NEXT