Porsche Crash Case Esakal
पुणे

Porsche Crash Case: अपघातानंतर बदललेलं ते ब्लड सॅम्पल आरोपीच्या आईचंच; धक्कादायक माहिती आली समोर

सुनील गाडेकर

अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी रक्ताच्या नमुन्यामध्ये बदल केल्याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यात आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

पुणे : कल्याणीनगरमधील अपघातात अल्पवयीन (Pune Porsche Accident) चालकाच्या ऐवजी घेतलेली रक्त हे मुलाच्या आर्इचेचे असल्याचे डीएनए अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मुलाच्या आईचा डीएनए तपासणीचा न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा (एफएसएल) अहवाल पोलिसांना मिळाला आहे. त्यातून हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी रक्ताच्या नमुन्यामध्ये बदल केल्याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यात आत्तापर्यंत सात जणांना करण्यात आली आहे. अपघाताचा गुन्हा घडल्यावर ससून रुग्णालयात मुलाला नेण्यात आले, त्याचा रक्ताचा नमुनाही घेण्यात आला. परंतु, त्यावेळी मुलाऐवजी आईच्या रक्ताचे नमुने मद्याची मात्रा तपासण्यासाठी देण्यात आले होते, असे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांना सांगितले.

तपासणीसाठी देण्यात आलेले रक्त हे एका महिलेचेच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. पुढे तपासामध्ये मुला ऐवजी त्याच्या आईच रक्त दिल्याचे तांत्रिक पुराव्यावरून व तिच्याकडे केलेल्या चौकशीवरून समोर आले होते. आता मुलाच्या आईच्या रक्ताचा डीएनए अहवाल प्राप्त झाला असून डॉक्टरांनी घेतलेले रक्त हे मुलाचे आईचे असल्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.

मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम १४ दिवस वाढवावा; पोलिसांचा बाल न्याय मंडळाला अर्ज

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचा अर्ज पुणे पोलिसांनी दाखल केला आहे. त्यामुळे मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे.

पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठविण्याचा आदेश मंडळाने दिला आहे. ही मुदत संपत असल्याने पोलिसांनी मुलाला आणखी काही दिवस बालसुधारगृहात ठेवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज सोमवारी (ता. ३) दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेले सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी हा अर्ज केला आहे.

म्हणणे सादर करण्यासाठी पोलिसांनी मागितली मुदत

बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) कायदा २०१५ चे कलम १५ नुसार विधी संघर्षित बालकाचे मूल्यांकन करण्यासाठी गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व कागदपत्रे एक महिन्याच्या आत पाठविणे आवश्यक आहे. गुन्हा दाखल होऊन १६ हून अधिक दिवस झालेले आहेत. त्यामुळे गुन्ह्यात झालेल्या तपासाची कागदपत्रे आणि त्याचा अहवाल वेळेत सादर करण्याचे नियोजन केले आहे.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये व्यस्त असल्यामुळे आणि तपासामधून अधिक पुरावा मिळण्याची शक्यता असल्यामुळे मुलाच्या मुदतवाढीबाबच्या अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी १४ जूनपर्यंत मुदतवाढ मिळण्यात यावी, अशी विनंती देखील पोलिसांनी केली आहे.

मुलाचा ताबा मिळण्यासाठी पहावी लागणार वाट

बालसुधारागृहातून सुटका झाल्यानंतर मुलाचा ताबा अग्रवाल कुटुंबीयांचे कौटुंबिक मित्र असलेल्या एका कुटुंबाकडे द्यावा, असा अर्ज त्यांच्या वकिलांना सोमवारी (ता. ३) मंडळात दाखल केला आहे. हे कुटुंबीय अग्रवाल राहत असलेल्या परिसरातच रहायला आहे. मंडळातून सुटका झाल्यानंतर मुलाचा ताबा कोणाकडे द्यायचा आहे त्यांची नावे द्यावीत, अशी सूचना मंडळाने मुलाच्या कुटुंबीयांच्या वकिलांना केली आहे.

मुलाचा त्याचा रक्ताच्या नात्यातील सदस्यांकडे ताबा देता येणार नाही. त्यामुळे त्रयस्थ व्यक्तीची नावे द्यावीत, असे मंडळाने सूचित केले होते. त्यानुसार ही नावे देण्यात आली आहे. मात्र आता त्या कुटुंबाला मुलाचा ताबा मिळण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT