drone sakal
पुणे

ड्रोनच्या धोक्यावर अत्याधुनिक यंत्रणांचा उतारा

संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अपेक्षा, भारताच्या सीमेला धोका

अक्षता पवार

पुणे : जागतिक स्तरावर युद्धनीती बदलत आहे. जागतिक स्तरावर सैनिकांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या विकासासाठी संशोधन सुरू आहे. असे होत असताना भारताच्या सीमेलगत भागांवरही ड्रोनचा धोका वाढत असल्याच्या घटना मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. यामुळे देशाच्या संरक्षणाचे प्रश्‍न निर्माण होत आहेत. अशा धोक्यांना टाळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांच्या विकासावर भर द्यायला हवा, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली.(possible drone attack india strong development system)

ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन म्हणाले, ‘‘ड्रोन्सचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे आहेत. त्यानुसार अतिघातक असलेल्या ड्रोन्सचा विनाश करण्यासाठी अँटी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्‍यक आहे. जे कमी घातक आहेत, ते मशिनगन आदींच्या साह्याने पाडावेत. त्याचबरोबर अशा भागातील नागरिकांना ड्रोन्स ओळखणे शिकविण्याची गरज आहे. त्यांचा आवाज, दिसतात कसे, याचा अभ्यास करावा लागेल. त्यामुळे सैन्याला फायदा होईल. ड्रोन्सची लढाई दीर्घकाळ करावी लागले. आपल्याकडे असलेल्या ड्रोन्सचा वापर पाकिस्तान विरुद्ध करता येईल. सर्जिकल स्ट्राईक हवाईदल ड्रोनच्या वापरातून केव्हा करेल, हे ही पहावं लागेल. यातून पाकिस्तान आणि चीनला उत्तर देता येईल.’’

ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आज वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जात आहे. हे अत्यंत सहज उपलब्ध होणारे आणि वापरण्यास सोपे आहे. त्यामुळे ड्रोन्सच्या मदतीने दहशतवाद्यांकडून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केले जाऊ शकतो. सध्या अफगाणिस्तानमधील घडामोडी पाहता याचा परिणाम काश्मीर आणि पंजाबसारख्या राज्यांवरही होऊ शकतो. देशाच्या सुरक्षेसाठी अशा लोकांना ओळखण्यासाठी आपल्याकडे प्रभावी पाळत ठेवणारी यंत्रणा व त्याचबरोबर गुप्तचर विभाग व इतर विभागांशी समन्वयाची गरज आहे, अशी माहिती लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र आर. निंभोरकर यांनी दिली.

ड्रोन हे दहशतवादी शस्त्र म्हणून अत्यंत कमी किमतीचा पर्याय आहे. कमी उंचीवरही उडण्यास सक्षम असल्याने त्यास शोधणे अवघड असते. आज ड्रोन हल्ल्यांचा धोका आहे. देशाला ड्रोन धोरणाचा आढावा घेण्याची आणि संवेदनशील भागात ड्रोनच्या वापराला बंदी घालत, आणि लेझर गनसह ड्रोन विरोधी संरक्षण यंत्रणा विकसित करणे आवश्यक आहे.

- मेजर जनरल (निवृत्त) राजन कोचर, संरक्षण विश्‍लेषक

ड्रोन्सचा धोका

  • ड्रोन्सचा वापर स्फोटके टाकण्यासाठी केला जाऊ शकतो

  • देशात अफू, रायफली, खोट्या नोटा सारख्या गोष्टी पाठवण्यासाठी होऊ शकतो.

  • अणुहल्ल्याचाही धोका निर्माण होऊ शकतो

  • देशाच्या हालचालीवर लक्ष ठेवणे

उपाय काय

  • ड्रोन शोधणे आणि त्यांना पाडणे

  • लहान ड्रोन शोधण्यासाठी रडारचा वापर

  • आधुनिक रडार तयार करावे लागतील. मात्र याला खर्च जास्त

  • सध्या उपलब्ध साधनांचा वापर ड्रोन पाडण्यासाठी करावा

  • ड्रोन कसे ओळखायचे, त्यांना पाडायचे कसे याचे प्रशिक्षण

  • रायफल आणि हेलिकॉप्टरच्या साह्याने ड्रोन पाडणे शक्य

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

  • ड्रोन्सला जॅमर लावता येतील

  • त्याद्वारे त्याची उड्डाण क्षमता आणि लढाऊ क्षमता कमी होईल,

  • लेझर गण वापरता येतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT