पुणे

मतदानाच्या प्रमाणावर निकाल फिरण्याची शक्यता

सलिल उरुणकर

पुणे - अप्पर-सुपर इंदिरानगर या २७ क्रमांकाच्या प्रभागामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समान संधी निर्माण झाली आहे. वस्तीचा भाग ७० टक्के आणि सोसायट्यांचा भाग ३० टक्के अशी या नव्या प्रभागाची रचना असल्यामुळे मतदानाच्या प्रमाणावर या प्रभागातील निकाल फिरण्याची शक्‍यता आहे. 

हा प्रभाग तीन सदस्यांचा आहे. त्यामध्ये एकूण ४०,४८८ मतदार आहेत. त्यापैकी २१,४१५ पुरुष, तर १९,०७३ महिला मतदार आहेत. प्रभागामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एक जागा, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी एक आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी एक जागा आहे. बिबवेवाडीतील पुष्पम गॅस एजन्सीजवळ असलेल्या कॅनरा बॅंकेपासून सुरू होणाऱ्या या प्रभागात महेश सोसायटी, चिंतामणीनगर, चैत्रबन सोसायटी, विघ्नहरनगर, अप्पर-सुपर इंदिरानगर, अंबिकानगर, आईमाता मंदिर हा संपूर्ण परिसर येतो. विद्यमान नगरसेवक पिंटू ऊर्फ दिनेश धाडवे आणि नगरसेविका दीपाली ओसवाल यांच्या जुन्या प्रभागाचा बहुतांश भाग नव्या प्रभागरचनेत आहे. व्हीआयटी वसतिगृहाजवळचा काही भाग मात्र नव्याने जोडण्यात आला आहे. काँग्रेसचीही काही पारंपरिक मते या प्रभागात आहेत, मात्र तिन्ही ठिकाणी काँग्रेसने उमेदवार दिलेला नाही. 

धाडवे यांनी राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांची पत्नी रूपाली या ‘ब’ गटातून म्हणजे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी असलेल्या गटामध्ये भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. धाडवे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वर्षाराणी कुंभार, शिवसेनेच्या शारदा भोकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माधुरी जोशी रिंगणात उतरल्या आहेत. 

अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी असलेल्या ‘अ’ गटामध्ये भाजपच्या वर्षा साठे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शिंदू बसवंत, शिवसेनेच्या बालिका जोगदंड आणि मनसेच्या कविता वाघमारे लढत आहेत. प्रभागातील चुरशीची लढत ही खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या ‘क’ गटामध्ये होत आहे. शिवसेनेचे बाळासाहेब ओसवाल यांच्या विरोधात भाजपचे गौरव गणेश घुले आणि मनसेचे राहुल गवळी उभे ठाकले आहेत. 
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार मोठ्या संख्येने असलेला काही ठराविक भाग या प्रभागामध्ये आहेत. ही पारंपरिक मते कोणाच्या पारड्यात पडणार, पक्षांतर आणि लाटेचा प्रभाव कितपत राहील या प्रश्‍नांच्या उत्तरावर या प्रभागातील जय-पराजयाची गणिते अवलंबून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

तो सरळ सरळ खोटं... गोविंदासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर नीलमने सोडलं मौन; म्हणते- ते सगळं फक्त

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

SCROLL FOR NEXT