Pune Loksabha Constituency sakal
पुणे

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पुणे शहर यांच्यावतिने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पुणे शहर यांच्यावतिने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा देण्यात आला आहे. भाजप ओबीसी मोर्चा पुणे शहराध्यक्ष नामदेव माळवदे यांच्या उपस्थितीत पुणे येथे पदाधिकाऱ्यांच्या वतिने मोहोळ यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.

खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली ही संघटना कार्यरत असून, डॉ. भूषण कर्डिले हे संघटनेचे महासचिव आहेत. पुणे शहर तसेच परिसरात तेली समाजाची एक लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. समाजाचे मतदान निर्णायक असल्याने, समाजाच्या उन्नतीसाठी तसेच प्रगतीकरिता हा पाठिंबा जाहीर करत असल्याचे मत शहर सचिव जीवन येवले यांनी व्यक्त केले.

या वेळी प्रदिप क्षीरसागर, प्रकाश कर्डीले, कृष्णा भादेकर, नीलम घाटकर, अश्विनी चिंचकर, शंकर नवपुते, हनुमंत फल्ले, ज्ञानेश्वर देवमाने, विजय भोज, रमेश भोज, विजय हाडके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जीगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT