पुणे

अप्रतिम! पुणेकरानं 50 हजार तुकड्यातून साकारला चंद्राचा 'मुखडा'

पुणेकराने मिळवली चंद्राची सर्वात स्पष्ट प्रतिमा

शरयू काकडे

पुणे : कॅमेरा आणि टेलिस्कोपच्या साहाय्याने तुम्ही चंद्राचे छायाचित्र कधी काढले आहे का? हे छायाचित्र जर तुम्ही 'झूम' केले तर ते तुम्हाला 'ब्लर' दिसेल. पण एका पुणेकराने चंद्राचे असे छायाचित्र काढले आहे, की तुम्ही कितीही झूम केले तर ते 'ब्लर' दिसणार नाही. चंद्रावरील टेकड्या, खोलगट भाग, खनिजे अगदी स्पष्ट दिसतात.(prathamesh Jahu from Pune Create Amazing Pictures of Moon by Processing 50000 Images of 186 GB size)

नुकताच दहावीतून अकरावीत गेलेल्या १६ वर्षाच्या हौशी खगोलनिरीक्षक प्रथमेश जाजू याने ही अप्रतिम त्रिमितीय दिसणारी प्रतिमा साकारली आहे. त्यासाठी त्याने चंद्राचे छोटे छोटे आणि स्पष्ट ५० हजार छायाचित्र काढून ते जोडले आहे.

प्रथमेश सांगतो, ''जवळपास 186 जीबी पेक्षा जास्त साईजमधील हे फोटो मोठ्या संख्येने डाऊनलोड करताना त्याच्या लॅपटॉपचा प्रोसेसर जवळपास खराब झाला असता. त्यानंतर अखेर सर्व प्रयत्नांनतर डाऊलडोड झालेला फोटो जवळपास 50 मेगापिक्सेलचा होता. मोबाईलमध्ये हे फोटो पाहाण्यासाठी त्याने त्यांची साईज कमी केली. फोटोग्राफीमध्ये दोन फोटो एकत्र करुन कम्पोजिंग टेक्निक नेहमी वापरली जाते, ज्यामध्ये एकाच ठिकाणीवरील वेगवेगळे घटक घेऊन अभासी प्रतिमा तयार केली जाते.'' HDR last quarter mineral Moon'' असे नाव जाजूने या प्रतिमेला दिले आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या माध्यमातून माझी खगोलनिरीक्षणाची आवड जोपासत गेलो. तसेच यासाठीचे आवश्यक तंत्र इथूनच शिकलो, असे प्रथमेश सांगतो.

असं मिळवलं छायाचित्र :

  • २०१८ मध्ये चंद्राचे छायाचित्र घेण्यास सुरुवात

  • चंद्राच्या छोट छोट्या भागाचे 38 व्हिडीओ काढले

  • त्यातील ६० हजार पेक्षा जास्त छायाचित्र मिळवले

  • निवडक ५० हजार छायाचित्रांना जोडत एक पूर्ण छायाचित्र साकारले

छायाचित्र विशेष का?

  • कितीही झूम केले तर प्रतिमा स्पष्ट दिसते

  • चंद्राच्या तपकिरी आणि निळ्या -राखाडी छटा स्पष्ट दिसतात

  • या रंगांतून चंद्रावरील खनिजांची माहिती मिळते.

छायाचित्रणासाठी वापरले साहित्य :

  • 1,500 mm वर 38 पॅनेल आणि 3,000 mm फोकल लांबीसह 1.2 मेगापिक्सेल ZWO ASI120MC-S या अस्ट्रोनॉमी कॅमेरा

  • सेलेस्ट्रॉन 5 कॅसग्रीन ऑप्टिकल ट्यूब असेंबली टेलिस्कोप

''चंद्रासह मी आपल्या सूर्यमालेतील सर्वच ग्रहांचे छायाचित्र काढले आहे. येत्या काळात सुर्यावरील सौरडागांचे छायाचित्र काढण्याचा माझा विचार आहे. पुढे जाऊन खगोलशास्रातच करियर करण्याचा माझा विचार आहे.''

- प्रथमेश जाजू, हौशी खगोलनिरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT