pre wedding shoot craze marriage cultural significance Sakal
पुणे

Pre Wedding Shoot : लग्नात नववधू वरांना" प्री वेडिंग शूट" चे लागलंय वेड

हल्ली लग्नामध्ये प्री-वेडिंग शूट ला नवं वधू-वरांच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. नववधू वरांना प्री-वेडिंग शूट च वेड लागलेल आहे

हरिदास कड

Chakan News : हल्ली लग्नामध्ये प्री-वेडिंग शूट ला नवं वधू-वरांच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. नववधू वरांना प्री-वेडिंग शूट च वेड लागलेल आहे. लग्नसोहळा आणि त्या अगोदरचे नववधूवरांचे सहवासाचे क्षण कॅमेऱ्यात टिपणे , व्हिडिओ करणे, रिल्स करणे, व्हिडिओ करून युट्युब वर, इंस्टावर टाकणे याला विशेष महत्त्व आहे.

लग्नाअगोदरच्या नववधू-वरांच्या आठवणीचे फोटो, व्हिडिओ करून त्या आठवणी डोळ्यात साठवून मोठ्या स्क्रीनवर लग्न समारंभात दाखविणे याला महत्व आले आहे. लग्ना अगोदरच्या आठवणी कॅमेऱ्यात बंदिस्त करून व्हिडिओ स्वरूपात त्याची निर्मिती करणे त्याला प्री वेडिंग शूट म्हटले जाते. एक नवीन ट्रेंड सध्या शहराबरोबर ग्रामीण भागात, निमशहरी भागात सद्या वाजतो,गाजतो आहे.

अलीकडच्या काळात लग्न म्हणजे एक नुसता धार्मिक विधी नव्हे. तो आनंदाचा, उत्साहाचा, मजेचा एक क्षण मानला जातो. ज्यावेळेस नववधू वराच्या विवाह सोहळ्याची तारीख ठरविली जाते त्या अगोदर नववधू वर प्री-वेडिंग शूट करतात.

त्यावर हजारो तसेच काहीजण लाखो रुपयेही खर्च करतात.कोण मुंबई, कोकण,गोव्याला, महाबळेश्वर,दुबई, युरोप मध्ये जाऊन शूट करतं तर कोण स्टुडिओमध्ये करतं . कोण नैसर्गिक ठिकाणी, कोण पर्यटन स्थळावर शूट करतो.

ज्याच्या त्याच्या प्री-वेडिंग शूटच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. प्री-वेडिंग शूट मुळे फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स यांना मोठी मागणी वाढली आहे. फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर लग्न समारंभासाठी निश्चित केले जातात.

त्यामुळे त्यांचा धंदा ही वाढलेला आहे.प्री-वेडिंग शूट केल्यानंतर त्याचे हिंदी, मराठी गाण्यासहीत व्हिडिओ पाच,दहा मिनिटाच्या कालावधीत गाणे असलेले स्क्रीनवर सातत्याने विवाह सोहळ्यात दाखवले जातात. त्यामुळे एलईडी स्क्रीनलाही महत्त्व आले आहे.

नववधूवरांचे लग्ना अगोदर चे फोटो, व्हिडिओ प्री -वेडींग शूट याकडे पाहुणेमंडळी, वऱ्हाडीमंडळी, मित्र, मैत्रिणी यांचे विशेष लक्ष राहते आणि ते आवडीने पाहिले जातात. प्री वेडिंग शूट एक आनंदाचा, मजेचा चर्चेचा विषय झाला आहे हे निश्चित आहे.

"पण या प्री वेडींग शूट या पाश्चात्य संस्कृतीला आळा बसला पाहिजे. यामुळे भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होतो आहे असे सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ वकील ऍड.पोपटराव तांबे यांचे म्हणणे आहे." प्री-वेडिंग शूट हे लग्नाआधी होत असल्यामुळे नववधू वरात त्यामुळे काही वादही होतात आणि लग्नही मोडतात.अगदी पोलीस ठाण्यातही ही प्रकरणे जातात असे अनेक प्रकार घडत आहे. त्यामुळे प्री-वेडिंग शूट ला वधू-वरांचे पालकही धास्तावलेले आहेत असे वास्तव आहे.

प्रॉप्स, प्रॉपर्टी चा वापर

लग्ना अगोदरच्या प्री-वेडिंग शूट वेळी फोटो फ्रेम, तसेच विविध प्रकारची प्रॉपर्टी वापरली जाते. यामध्ये विशेषत : रंगी बेरंगी छत्र्या, फ़ुगे,सायकल, बाईक, बुलेट,कार, बैलगाडी, लग्न तारखेच्या पाट्या, वधू, वरांच्या नावाच्या पाट्या असे विविध प्रॉप्स वापरले जातात. प्री वेडींग शूट चा एक ट्रेंड झाला आहे.

प्री वेडिंग शूट साठी मुंबई,गोवा, कोकणातील सागर किनारे, विविध पर्यटन स्थळे यांना तरुण, तरुणी पसंती देतात. काहीजण दुबईमध्ये जाऊनही प्री वेडिंग शूट करतात.मराठी,हिंदी चित्रपटातील गाण्याप्रमाणे वधू वर स्टाईल करून प्री वेडिंग शूट करतात. विविध रंगी आकर्षक फॅशनेबल कपड्यांचा ही वापर केला जातो.

प्रीवेडिंग शूटला हल्ली खूप महत्त्व आहे. त्यामुळे फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स यांचा धंदा वाढला आहे हे खरे आहे. फोटोशूट साठी पंधरा ते वीस हजार रुपये कमीत कमी खर्च येतो. फोटोशूट,व्हिडिओ शूट साठी चाळीस ते पन्नास हजार रुपयेही खर्च येतो. असे फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर सचिन गोरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sada Sarvankar: सदा सरवणकर आज काय निर्णय घेणार? मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं

सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या सभांसाठी ‘हे’ नेते फायनल! पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

Latest Marathi News Updates : महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू राज्यात आज पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT