Narendra Modi Sakal
पुणे

Changes in Transportation : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त असे असतील शहरातील वाहतुकीत बदल

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त शहरात गुरुवारी (ता. २६) वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक दुपारी तीन वाजल्यापासून वळविण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा ते सारसबाग- पूरम चौकदरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. स्वारगेट परिसर, लालबहादूर शास्त्री रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्त्यासह काही प्रमुख रस्त्यांवर नो-पार्किंग करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

पर्यायी मार्ग - सिंहगड रस्त्यावरून स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून उजवीकडे वळून मित्रमंडळ चौक ते व्होल्गा चौकमार्गे इच्छित स्थळी जाता येईल. मित्रमंडळ चौकातून स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते डावीकडे वळून सिंहगड रस्ता जंक्शनवरून वाहनचालकांना इच्छित स्थळी जाता येईल.

केशवराव जेधे चौक ते सातारा रस्ता प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग - लोकमान्य टिळक रस्ता आणि छत्रपती शिवाजी रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांनी केशवराव जेधे चौकातून डावीकडे वळून ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक)- उजवीकडे वळून वखार महामंडळ- मार्केट यार्ड जंक्शनवरून सातारा रस्त्याकडे जाता येईल.

सेव्हन लव्हज चौक ते केशवराव जेधे चौक प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग - सेव्हन लव्हज चौकातून डावीकडे वळून वखार महामंडळ-उजवीकडे वळून सातारा रस्त्याने इच्छित स्थळी.

व्होल्गा चौक ते जेधे चौक प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग - व्होल्गा चौकातून डावीकडे वळून स्वातंत्र्यवीर सावरकर चौकमार्गे इच्छित स्थळी.

कामगार पुतळा ते छत्रपती शिवाजी चौकदरम्यान दोन्ही बाजूने प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग - कामगार पुतळा ते शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छित स्थळी.

पार्किंगची ठिकाणे -

पाटील प्लाझा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता, डीपी रस्ता म्हात्रे पुलाजवळ, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, हरजीवन रुग्णालय सावरकर चौक, पीएमपी मैदान पूरम चौक, नीलायम टॉकीज, विमलाबाई गरवारे शाळा, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कटारिया हायस्कूल, मिनर्व्हा पार्किंग मंडई, हमालवाडा पार्किंग.

तसेच, कार्यक्रमास येणाऱ्या बसेससाठी डीपी रस्ता कोथरूड, शिवनेरी रस्ता मार्केट यार्ड येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Mains 2023 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर; महेश घाटुळे परीक्षेत पहिला, मुलींमध्ये वैष्णवी बावस्कर अव्वल

2024 Pune car crash: पोर्शे कार अपघातानंतर केलेले कारनामे भोवणार; गुन्ह्यांत कलमवाढ! अल्पवयीन आरोपीचा पाय खोलात

'गुड टच अँड बॅड टच' ची कार्यशाळा सुरू होती, तरुणीनं असं काही सांगितलं की पोलिसांना बोलवावं लागलं, काय घडलं?

Kalyaninagar Accident प्रकरणी रक्ताचे नमुने बदलण्यात सहभाग असलेल्या दोन आरोपींचा जामीन फेटाळला

जितिया सणादरम्यान मोठी दुर्घटना! 43 जणांचा बुडून मृत्यू, घटनेत 37 मुलांचा समावेश, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT