Prime Ministers narendra modi visit to launch of Awas Yojana sakal
पुणे

Pune News : आवास योजनेच्या लोकार्पणाला पंतप्रधानांच्या दौऱ्याचा मुहूर्त ?

महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेतून शहरात पाच ठिकाणी २ हजार ९१८ सदनिका बांधल्या

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेतून शहरात पाच ठिकाणी २ हजार ९१८ सदनिका बांधल्या आहेत. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यास पंतप्रधान कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यास एक आॅगस्ट रोजी हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हडपसर सर्वे क्रमांक १०६ अ येथे ३४० सदनिका, हडपसर सर्वे क्रमांक ८९ येथे ५८४, हडपसर सर्वे क्रमांक १०६ येथे १०० सदनिका, खराडी सर्वे क्रमांक ५७ येथे ७८६ आणि वडगाव खुर्द सर्वे क्रमांक ३९ येथे ११०८ सदनिका बांधण्याचा निर्णय घेतला. त्याचे काम २०१८ मध्ये सुरू झाले होते. कोरोनामुळे या प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली.

या योजनेतील लाभार्थ्यांना ३३० चौरस फुटांचे घर मिळणार असून, त्याची एकूण किंमत ११ लाख रुपये आहे. त्यापैकी २.५० लाख रुपये शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहेत. उर्वरित रकमेसाठी नागरिकांनी कर्ज काढलेले आहे.

नागरिकांना मार्च २०२३ मध्ये घराचा ताबा मिळेल असे सांगण्यात आले होते. पण त्यानंतर २० जून, ५ जुलैची मुदत देण्यात आली होती. वारंवार मुदतवाढ मिळत असल्याने लाभार्थ्यांना नेमके घर कधी मिळणार हे कळत नव्हते.

या प्रकल्पांचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, काही कामे राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक आॅगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी येणार आहे. त्यामुळे या वेळी मोदींनी या कार्यक्रमासाठी वेळ देऊन या घरांचे लोकार्पण करावे यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

‘‘पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे लोकार्पण पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे यासाठी प्रयत्न असून, त्यासाठीचा प्रस्ताव पाठवला आहे.’’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT