पुणे

खासगी ट्रॅव्हलची मनमानी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - तुम्ही जर खासगी ट्रॅव्हलच्या बसने बाहेरगावी जाण्याचे नियोजन करत असाल, तर जादाचे पैसे मोजण्याची तयारी ठेवा. ऐन सणासुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हलने बसच्या भाड्यात तिपटीने वाढ केली आहे. परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. 

शहरातून नागपूर, अहमदाबाद, जळगाव, इंदूर आदी ठिकाणी जाण्यासाठी नेहमी एक हजार रुपयांपर्यंत भाडे घेतले जाते. त्यात दुप्पट, तिप्पट वाढ केली.  

मागणी का? 
एसटी महामंडळाची अनेक ठिकाणी आंतरराज्य बससेवा नाही. रेल्वे गाड्यांची आरक्षणे फुल्ल झाली आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी बसकडे वळावे लागते. खासगी बसचालकांनी प्रवाशांकडून जादा भाडे आकारू नये, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, खासगी ट्रॅव्हलचालक त्याकडे दुर्लक्ष करून जादा भाडे घेतात. अहमदाबाद, इंदूर, हैदराबाद, बंगळुरू या ठिकाणांसाठी आकारण्यात येणाऱ्या भाड्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. दिवाळी सुटीत त्यात आणखी वाढ होऊ शकते. 

एका खासगी व्यावसायिकाने सांगितले, ‘‘दिवाळीमध्ये खासगी बसला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे आम्हाला खासगी बसच्या भाड्यात वाढ करणे अपरिहार्य ठरते.’’

शहरातून बाहेरच्या राज्यांमध्ये जाण्यासाठी बससेवा उपलब्ध नाही. महाराष्ट्राच्या लगतच्या राज्यांमध्ये जाण्यासाठी त्या त्या जिल्ह्यांमधून बससेवा उपलब्ध आहे.
- संजय भोसले, आगार व्यवस्थापक, एसटी महामंडळ, वल्लभनगर

गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीत गावी जातो. खासगी ट्रॅव्हलच्या दरवाढीमुळे आर्थिक ताण पडतो. खासगी बसचे भाडे नियंत्रित ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश दिले असले, तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. 
- नितीन शर्मा, प्रवासी  

खासगी भाडे
ठिकाण    वातानुकूलित बस                  

नागपूर    २,५७५ रुपये 
इंदूर    ३,१५० रुपये
अहमदाबाद    २,५२५ रुपये 
जळगाव    १,५७५ रुपये  
अकोला    २,०९० रुपये  
हैदराबाद    २,७५० रुपये 
बंगळुरू    ३००० रुपये 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT