गराडे (पुणे) : लॉकडाउन व कोरोना काळातच भोर महाविद्यालयाची नोकरी सोडली. मग काय करायचे, उत्पन्नाचे साधन काय, हा विचार करीत असताना दाजी प्रशांत इनामके यांची शेती सासवड येथेच आहे. त्यांचा आदर्श घेत त्यांच्याच सीताफळ बागेत शेती करण्याचा निर्णय घेतला. मधल्या काळात माळेगाव येथील विद्या प्रतिष्ठान येथील कमल नयन बजाज इंजिनिअरिंग कॉलेज येथे सहप्राध्यापक म्हणून मुलाखत दिली. पण कोरोनामुळे कॉलेज सुरू नव्हते. मग या काळात शेती करीत मिळविले हजारो रुपयांचे उत्पन्न मिळविले. सांगत होते सासवड (ता. पुरंदर) येथील ओंकार राजेंद्र गिरमे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
फेब्रुवारीत शेती मशागत सुरू केली व कोथिंबीर लावली. मग मला लोकांनी सांगितले की, तुम्ही आणखी पालेभाज्या लावा. मग कोथिंबीरीबरोबर मेथी, वांगी, गवार, भेंडी, मिरची लावली. हे सर्व सीताफळ बागेत आंतरपीक म्हणून 16 गुंठे जागेत केले. उत्पादन सुरू झाल्यावर लॉकडाउन असल्याने सासवड मार्केट बंद होते. ग्राहकांचे मला फोन यायचे आणि त्यांना मी हे घरी नेऊन भाजी द्यायचो. या 40 ते 60 दिवसांच्या काळात या आंतरपिकातून मला 35 हजार रुपये मिळाले, असे गिरमे यांनी सांगितले.
Video : अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना
ऑगस्टमध्ये पहिल्या भाज्या संपल्यामुळे अडीच हजार कोबी आणि अडीच हजार फ्लॉवर लावला. पण आता 1 सप्टेंबरपासून कॉलेज सुरू झाले आहे. ते करीत पुढे शेती करणार आहे.
- प्रा. ओंकार गिरमे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.