Prohibitory Orders pune esakal
पुणे

Prohibitory Orders: काय झाडी काय डोंगर...फिरायला जायचा प्लॅन करताय? तर थांबा! पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश वाचा

Sandip Kapde

पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाळा सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणी धबधबे तयार झालेले आहेत. तसेच भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक वर्षाविहार पर्यटनासाठी येत असतात. सुट्टीच्या दिवशी राज्याच्या विविध भागातून तसेच मुंबई शहर व पुणे शहरातून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

अशावेळी वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसें यांनी जमावबंदी आदेश दिलेत. यापूर्वी भिमाशंकर अभारण्य व इतर ठिकाणी सायंकाळी ६ नंतर पर्यटकांना ३० सप्टेंबर पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

आदेशांचे उल्लंघन आणि दंड-

या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लंघन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ नुसार दंडनीय अथवा कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.

प्रतिबंध लागू असलेली ठिकाणे-

मावळ तालुका: भुशी डॅम, धरणे व गड किल्ले परिसर, वडगाव मावळ येथील बेंदेवाडी, डाहुली' (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे
लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्द: टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, राजमाची पॉईंट, खंडाळा, सहारा ब्रीज, पवना धरण, टाटा धरण, घुबड तलाव परिसर
मुळशी तालुका: मुळशी धरण व ताम्हीणी घाट जंगल परिसर व मिल्कीबार धबधबा
हवेली तालुका: खडकवासला धरण, वरसगाव धरण व सिंहगड, गडकिल्ले परिसर
आंबेगाव तालुका: डिंभे धरण परिसर, कोंडवळ धबधबा
जुन्नर तालुका: माळशेज घाट तसेच धरणे व गडकिल्ले परिसर, शिवनेरी व माणिक डोह
भोर तालुका: भाटघर धरण व गडकिल्ले परिसर, पाण्याचे धबधबे, वेल्हा तालुक्यातील धरण व गडकिल्ले परिसर, कातळधरा धबधबा
खेड तालुका: भिमाशंकर चासकमान धरण व भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे व जंगल परिसर
इंदापूर तालुका: कुंभारगाव बोटींग क्षेत्र

प्रतिबंधित क्रिया-

पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी
पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे
खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे
धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे
धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यास प्रतिबंध
धबधब्यावर मद्यपान करणे
मद्यधुंद अवस्थेत प्रवेश, कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे
मद्य बाळगणे, वाहतूक करणे, अनधिकृत विक्री व उघड्यावर सेवन
वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे
सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या
थर्माकॉल व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

IND vs BAN: टीम इंडियाचं ठरलं! अभिषेक शर्मा, संजू सॅमसन ओपनिंग करणार

मेट्रोच्या Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवेला आजपासून सुरूवात, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT