पुणे

नववर्ष बारामतीकरांसाठी ठरणार महत्वाचे...महत्वाकांक्षी प्रकल्प लागणार मार्गी

मिलिंद संगई

बारामती : येणारे वर्ष बारामतीकरांसाठी अत्यंत महत्वाचे असून बारामतीचा चेहरामोहरा बदलणारे असे त्याचे वर्णन करावे लागेल. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अजित पवार यांनी बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी कंबर कसली असून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प 2021 मध्ये मार्गी लागतील. बारामती शहर व तालुक्यातील जनतेसाठी उपयुक्त ठरणारे व आगामी पन्नास वर्षांचा विचार करुन हाती घेण्यात आलेले हे विकासाचे प्रकल्प असून देशातील एक टुमदार व विकसित शहर म्हणून या निमित्ताने बारामतीची ओळख होणार आहे. 

गेल्या काही वर्षात बारामतीचा सर्वांगिण विकास झाला, नवीन वर्ष हे बारामतीसाठी महत्वाचे ठरणार असून या वर्षात अनेक प्रकल्प पूर्णत्वास जातील. यात महत्वाचा म्हणजे शासकीय वैद्यकीय रुग्णालय हे आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी वरदान ठरणारे हे रुग्णालय ठरणार असून शासन दरात येथे रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रीया तसेच तपासण्या होतील. 

बारामतीत साकारणारे महत्वाकांक्षी प्रकल्प
•    बृहत बारामती पाणीपुरवठा योजना
•    नीरा डावा कालवा सुशोभिकरण व अस्तरीकरण
•    क-हा नदी स्वच्छता व सुशोभिकरण
•    तीन हत्ती चौकात सिटी सेंटरची निर्मिती
•    बारामतीत नवीन कलादालन व नाट्यसंकुल निर्मिती
•    80 कोटींची पोलिस कर्मचारी वसाहत
•    नवीन दोन साठवण तलावांची निर्मिती
•    भव्यदिव्य शिवसृष्टी प्रकल्प
•    वनपर्यटन केंद्र व चिंकारा उद्यान
•    बटरफ्लाय गार्डन
•    पोलिस उपमुख्यालयाची निर्मिती
•    अतिरिक्त पोलिस अधीक्षक व शहर पोलिस ठाणे कार्यालय इमारत
•    नवीन 50 कोटींचे सुसज्ज बसस्थानक
•    11 कोटींचे मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृह
•    बारामती शहरातील रस्त्यांच्या कामासाठी 45 कोटींची तरतूद
•    नवीन स्ट्रीट लाईटसाठी 15 कोटींची तरतूद
•    बारामती फलटण रेल्वे मार्ग काम पूर्णत्वाची शक्यता
•    पाटस ते बारामती नियोजित पालखी मार्ग काम संपण्याची शक्यता
•    बारामतीकरांना पाईपद्वारे गॅस मिळण्याची शक्यता. 
•    बारामतीत 10 कोटी खर्चून रेल्वे रुळाखालील अंडरपासनिर्मिती
•    बारामती शहर पोलिस ठाणे क्रमांक दोनची उभारणी
•    बारामती शहरात सीसीटीव्ही कॅमे-यांचे जाळे निर्माण करणे
•    श्रीमंत बाबूजी नाईक वाडा सुशोभिकरण
•    बारामती ते मोरगाव तीन पदरी रस्त्याचे काम पूर्ण होणार
•    बारामती तालुक्यातील अनेक पूलांची मजबूती व नवनिर्मिती
•    चार नवीन उद्यानांची निर्मिती केली जाणार. 
•    बारामतीतील शासकीय वैद्यकीय रुग्णालय 2021 मध्ये पूर्ण होणार. 
•    वसंतराव पवार नाट्यगृहाच्या जागी नवीन नाट्यसंकुल व शॉपिंग कॉम्प्लेक्स. 
•    बारामती जेजुरी हा टप्पा अर्ध्या तासात पार करता येणार.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

RCB Squad IPL 2025: काहे दिया परदेस! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं 'विदेशी' प्रेम; भुवनेश्वर, कृणाल पांड्याची निवड ठरणार मास्टरस्ट्रोक

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT