Pune Municipal Corporation sakal
पुणे

Property Tax : थकबाकीदारांना पुणे महापालिका लावणार चाप

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या खर्चाचा डोलारा सांभाळण्यासाठी मिळकतकर विभागावर प्रमुख जबाबदारी आहे. त्यामुळे या विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष भर दिला जात आहे. २०२३-२४ आर्थिक वर्ष संपण्यासाठी पाच महिने शिल्लक असून, उद्दिष्टपूर्तीसाठी तब्बल ९१८ कोटी रुपयांची गरज आहे. यासाठी या विभागात अतिरिक्त १५० कर्मचाऱ्यांची कुमक वाढवून थकबाकीदारांना चाप लावला जाणार आहे.

महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प ९ हजार ५१५ कोटी रुपयांचा आहे. यात नदीकाठ सुधार प्रकल्प, जायका प्रकल्प, उड्डाण पूल, भुयारीमार्ग यासह कर्मचाऱ्यांचे पगार, बोनस, दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामे, वीज बिल यासाठी मोठा खर्च आहे. हा खर्च भरून काढण्यासाठी मिळकतकरासह, बांधकाम विकास शुल्क, जीएसटी, शासकीय अनुदान हे उत्पन्नाचे स्रोत आहेत.

मिळकतकर विभागातर्फे नियमित कर भरणा वाढावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेतच. पण त्याचबरोबर निवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटीस बजावून तीनपट कर लावणे, थकबाकी न भरणाऱ्या नागरिकांच्या इमारती सील करणे, त्यांचा लिलाव करणे, नव्या बांधकामांना मिळकतकर लावणे व तो वसूल करणे यावर भर दिला जात आहे.

अभय योजना नाही

थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने यापूर्वी अभय योजना राबविली होती. त्यात थकबाकीच्या रकमेवर सूट दिली जाते. मात्र ही योजना राबविल्याने नियमित कर भरणाऱ्यांवर अन्याय करून थकबाकीदारांना सूट दिली जाते, अशी टीका सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने योजना न राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांना प्रत्येक महिन्याला दोन टक्के दंड लावला जात आहे. दंडाची रक्कम वाढू नये, यासाठी त्यांनी कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

वसुलीसाठी अधिक कुमक

महापालिकेने या वर्षी १५ मे ते २ ऑगस्ट या कालावधीत मिळकतकरात ५ ते १० टक्के सवलत दिली होती. त्यात ७ लाख ५५ हजार मिळकतधारकांनी १२८३ कोटी रुपये कर जमा केला. त्यानंतर इतर वसुलीमधून केवळ ११७ कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे मिळकतकराची वसुली मोहीम तीव्र करण्यासाठी १५० कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक या विभागाला देण्यात आली आहे.

यंदाचे मिळकतकराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणखी ९०० कोटी रुपये जमा करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी विविध मार्गांनी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी १५० अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहेत. मिळकती सील करणे, त्यांचा लिलाव करणे, न्यायालयीन प्रकरणे लवकर निकाली काढणे यासाठी हे कर्मचारी कार्यरत असतील.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test : Rohit Sharma संतापला; न्यूझीलंडच्या फलंदाजांनी मैदान सोडले, भारतीय खेळाडूंचा Umpire सोबत वाद

Like And Subscribe Movie Review: तरुणाई आणि सोशल मीडियाला जोडणारा धागा म्हणजे 'लाईक आणि सबक्राईब'

Jammu And Kashmir: जम्मू आणि काश्मीरला मिळणार पूर्ण राज्याचा दर्जा; नायब राज्यपालांची मंजुरी

IND vs NZ 1st Test : Sarfaraz Khan, ऋषभ पंतच्या मेहनतीवर पाणी; टीम इंडियाने गटांगळ्या खाल्ल्या; ५४ धावांत ७ विकेट्स पडल्या

Latest Maharashtra News Updates Live : महिलांच्या माध्यमातून देशात विकास साधायचाय : विजया रहाटकर

SCROLL FOR NEXT