pune municipal corporation  Sakal
पुणे

Pune News : महापालिकेत तृतीयपंथी सुरक्षा रक्षक नियुक्तीचा प्रस्ताव

तृतीय पंथी वर्गाचे समक्षमीकरण, त्यांना नोकरीमध्ये संधी उपलब्ध करून देणे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असताना पुणे महापालिकेनेही यामध्ये पुढाकार घेतला आहे.

​ ब्रिजमोहन पाटील

तृतीय पंथी वर्गाचे समक्षमीकरण, त्यांना नोकरीमध्ये संधी उपलब्ध करून देणे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असताना पुणे महापालिकेनेही यामध्ये पुढाकार घेतला आहे.

पुणे - तृतीय पंथी वर्गाचे समक्षमीकरण, त्यांना नोकरीमध्ये संधी उपलब्ध करून देणे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असताना पुणे महापालिकेनेही यामध्ये पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या सुरक्षा विभागात ५० तृतीयपंथी सुरक्षा रक्षक नियुक्त केले जाणार आहेत. त्याचा मान्यतेचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्तांपुढे सादर केला जाईल. या सुरक्षा रक्षकांना जेथे जास्त नागरिकांची वर्दळ होते अशा प्रमुख पाच ठिकाणांवर नियुक्ती दिली जाणार आहे.

महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, क्षेत्रीय कार्यालये, विविध वास्तू, मैदान, उद्याने या ठिकाणी सुरक्षा रक्षक आवश्‍यक आहेत. महापालिकेकडे सुरक्षा रक्षकाच्या ६५० जागा आहे, त्यापैकी केवळ ३२० सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने हे मनुष्यबळ अपुरे असल्याने १६४० सुरक्षा रक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले आहेत. त्यासाठी वर्षाला सुमारे ५० कोटी रुपये खर्च केले जातात.

महापालिकेतर्फे समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. सामाजिक विकास विभागातून योजना राबवून आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत केली जाते. तृतीयपंथी नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सुरक्षा विभागाने पुढाकार घेतला आहे. यामध्ये ५० तृतीय पंथीयांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे. सध्या दोन ठेकेदारांकडून १६४० कंत्राटी सुरक्षा रक्षक घेतले आहेत, त्यांच्याकडूनच या ५० जणांना कामावर घेतले जाईल. सध्या २८ जणांचे अर्ज आले आहेत. त्यास अतिरिक्त आयुक्त व आयुक्तांच्या मान्यतेनंतर त्यांच्या नियुक्तीवर शिक्कमोर्तब होणार आहे.

दरम्यान तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेत नोकरी मिळावी यासाठी काही सामाजिक संघटनांनी याबाबत महापालिकेकडे मागणी केली होती. यासंदर्भात बैठकाही झालेल्या आहेत. त्यामध्ये एकमत झाल्यानंतर प्रस्ताव मागविण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात सुरक्षा विभागात 50 जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. पण त्याचसोबत महापालिकेला कामाच्या ठिकाणी त्यांच्यासाठी सौहार्दाचे व चांगले वातावरण उपलब्ध करून देणे, स्त्री, पुरुष कर्मचाऱ्यांचे वर्तनही चांगले ठेवणे यासाठी विशेष सूचना दिल्या जाणार आहेत.

याठिकाणी होणार नियुक्तीस असणार हे सुरक्षारक्षक

  • पुणे महापालिका भवन, शिवाजीनगर

  • राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रज

  • राजीव गांधी रुग्णालय, येरवडा

  • कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ

  • सारसबाग, स्वारगेट

  • एकूण सुरक्षा रक्षक - १९२०

  • कायम सुरक्षा रक्षक - ३२०

  • कायम महिला सुरक्षा रक्षक -८

  • कंत्राटी सुरक्षा रक्षक - १६४०

  • महिला सुरक्षा रक्षक - सुमारे ७७५

‘सुरक्षा विभागात तृतीय पंथी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. पण त्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला जाईल.’

- माधव जगताप, उपायुक्त, सुरक्षा विभाग

‘तृतीय पंथी नागरिकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणले पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे महापालिकेने उशिरा का होईना पण चांगला निर्णय घेऊन तृतीय पंथींची नियुक्ती करावी. तसेच इतर विभागांमध्येही आवश्‍यक शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांनाही संधी द्यावी.’

- चांदणी गोरे, अध्यक्ष, निर्भया संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT