पुणे

सर्दी,खोकल्यापासून "फेस शिल्ड'द्वारे बचाव

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - सर्दी, खोकल्याच्या रुग्णांपासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील काही डॉक्‍टरांनी अभिनव शक्कल लढविली आहे. त्यामध्ये, त्यांनी बाजारातील विंड प्रोटेक्‍शन शिल्ड बरोबरच स्वतः अतिशय अल्प किंमतीत पुनर्वापर करता येण्या जोगे "फेस शिल्ड' तयार केले आहेत. 

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव चालू असून सर्दी, खोकल्यांच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्यादृष्टीने, वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई) उपयुक्त आहेत. परंतु, कमी उपलब्धता आणि त्याची किंमतही 1100 ते 2 हजार रुपये इतकी असल्याने त्याचा वापर करणे डॉक्‍टरांना शक्‍य होत नाही. "झेड' कीटची किंमत प्रतिनग 500 रुपये इतकी आहे. परंतु, ते खूप पातळ असून त्यामध्ये नाक, तोंडाची सुरक्षा करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे, अशा परिस्थितीत डॉक्‍टरांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी विविध मार्ग शोधले आहेत. त्याचाच, एक भाग म्हणून डॉक्‍टरांनी "फेस शिल्ड' म्हणून वापर करण्यास सुरुवात केली आहे. 

इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ.सुधीर भालेराव म्हणाले, 'रुग्णांची तपासणी करताना सर्दी, खोकल्याचा संसर्ग टाळणे पूर्ण शक्‍य नाही. हे लक्षात घेऊन माझ्यासह पत्नी आणि मदतनीस दुचाकीस्वारांसाठी वापरात असलेल्या विंड प्रोटेक्‍शन फेस शिल्डचा वापर करत आहोत. त्यामुळे, चेहरा संपूर्ण झाकला जातो. तसेच नाक, तोंड आणि डोळ्यालाही स्वतःचा सहज स्पर्श होत नाही. '' 

हिंजवडी येथील डॉ.आदेश काळे म्हणाले, 'बहुतेक डॉक्‍टर्स रुग्ण तपासताना शस्त्रक्रियेचे गाऊन, टोपी आणि एन-95 मास्क वापरतात. ओएचपी शिट, स्पंज अथवा थर्माकोल आणि रिबन यांच्या मदतीने मी "फेस शिल्ड' तयार केला आहे. हे शिल्ड बनविण्यासाठी प्रतिनग अवघा 5 रुपये इतका खर्च येतो. हे शिल्ड आपण निर्जंतुक करुन रोज वापरु शकतो. किंवा आवश्‍यकतेनुसार अधिक संख्येने बनवू शकतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

26/11 Mumbai Attack: 9 वर्षाची सर्वात लहान साक्षीदार... कसाबच्या विरोधात कोर्टात दिली होती साक्ष! कोण आहे ती मुलगी

Weather today : राज्यात गारठा वाढला, किमान तापमान 9.6 अंशांवर, उत्तरेतील थंडीच्या लाटेमुळे पारा आणखी घसरणार

Shaktikanta Das: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रकृती खालावली, चेन्नईच्या रुग्णालयात दाखल

Share Market Opening: भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत; बँकिंग-आयटी शेअर्समध्ये जोरदार वाढ

PAN 2.0 Project: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; करदात्यांना QR कोड असलेले नवीन पॅन कार्ड देणार

SCROLL FOR NEXT