protest against osho ashram administration pune  sakal
पुणे

ओशो भक्तांचे आश्रम व्यवस्थापनाविरोधात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘आचार्य रजनीश अर्थात ओशो हे आमचे श्रद्धास्थान असून, त्यांच्या समाधीचे दर्शन घेणे हा आमचा अधिकार आहे. ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनच्या व्यवस्थापनाकडून आश्रमात प्रवेशास विरोध केला जात आहे,’ अशी माहिती ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनचे माजी विश्वस्त स्वामी चैतन्य कीर्ती यांनी दिली.

आचार्य रजनीश यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भक्तांना आश्रम व्यवस्थापनाकडून समाधीस्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली. याविरोधात ओशो भक्तांनी गुरुवारी ओशो आश्रमाच्या प्रवेशद्वारासमोर निषेध आंदोलन केले.

स्वामी चैतन्य कीर्ती यांच्यासमवेत माँ धर्म ज्योती, स्वामी योग सुनील, माँ आरती, स्वामी मनोज यांच्यासह ओशो भक्त आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, या संदर्भात ओशो आश्रमाच्या व्यवस्थापन समितीशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: पुढच्या सामन्यांमध्ये तो असा खेळणार नाही, हीच अपेक्षा, कुलदीप यादव कोणाबद्दल असं बोलून गेला; वाचा

Pune Fire News: पुण्यात नवी पेठेत ग्रंथालयाला भीषण आग! अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

ED Seized PFI Properties: 'पीएफआय'शी संबंधित संस्थांवर ईडीची छापेमारी, ५६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा पावसाने झोडपले; पाच ठिकाणी कोसळली वीज, लाखो रुपयांचे नुकसान

Baba Siddique Case: बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणात मोठी अपडेट! पोलिस सुरक्षा रक्षक निलंबित

SCROLL FOR NEXT