पुणे

पुण्यातील निर्बंध उठविण्यासाठी धरणे धरायला हवे : अमृता फडणवीस

‘धागा’ हातमाग वस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

सम्राट कदम

पुणे : पुण्यामध्ये कोरोना प्रसाराचा दर चार टक्क्यापेक्षा खाली आहे. तरी पुणे शहरात अजूनही दुपारी चार नंतर लॉकडाउन होतो. मुंबईत या पेक्षा जास्त प्रसाराचा दर आहे. तरी ते खुले मात्र पुणे बंद का, खरं तर पुणेकरांनी यासाठी धरणे धरायला हवे, असे मत अमृता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

एरंडवणा येथील मनोहर मंगल कार्यालयातील ‘धागा हॅन्डलूम महोत्सवाचे’ उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या औचित्याने हे आयोजन माजी आमदार आणि भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्च्याच्या उपाध्यक्षा प्रा. मेधा कुलकर्णी यांनी केले होते. या प्रसंगी उषा काकडे, मुक्ता टिळक, जिल्हा उद्योग प्रशासकीय अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे, उमा खापरे, डॉ. आरती निमकर, स्वरदा बापट, अंकिता हर्षवर्धन पाटील, सुहासिनी मेहंदळे, नगरसेवक जयंत भावे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाल्या,‘‘हातमागावरील कारागिरांनी घडवलेल्या अप्रतिम कलाकुसर या महोत्सवात उपलब्ध आहेत. हातमाग व्यवसायात महिलांचा सहभाग मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी हातमाग व्यवसायाला प्राधान्य द्यायला हवे.’’ हातमागावरील घडवलेल्या अप्रतिम कलाकुसरीच्या या महोत्सवात सिल्क आणि कॉटनच्या साड्या, कुर्ते, पर्स, जॅकेट, विविध प्रकारची खेळणी उपलब्ध असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या,‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विणकरांसाठी विविध योजना तयार केल्या आहेत. या योजना जास्तीत जास्त विणकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आगामी काळात काम केले जाईल.’’ स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT